कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 18
मित्रांनो,ईश्वराने मानव झाडाझुडुपासह प्रत्येक सजीवाला जसे एक प्रतिकार शक्तीचे अदभूत वरदान दिलेले आहे, तसेच स्वताची कीडनियंत्रण व्यवस्था सुद्धा उभी केली आहे..ती म्हणजे जैविक कीडनियंत्रण म्हणजे मित्रकिडींचे सहाय्याने शत्रू किडींचे नियंत्रण. ही सुद्धा ईश्वरीय अफलातून व्यवस्था आहे. दोन प्रकारच्या किडी असतात....एक शत्रू किडी व दुसर्या मित्र किडी. मित्र किडी संख्येने तुलनात्मक शत्रू किडीपेक्षा कमी असतात. परंतु एक एक मित्रकीड हजार शत्रू किडींना नष्ट करते. कोणत्या शत्रू किडींना कोणत्या मित्र किडीने खावे ह्याचेही नियम ईश्वराने बनवले आहेत. उदाहरणार्थ, पिकावर येणार्या मावा कीडीला क्रोनोब्राथा अॅफीडीव्होरा ही मित्र कीड खाईल, तुडतुडे , पांढरी माशी ह्या शत्रु किडीला क्रायसोपा कार्नीया किंवा लेडी बग बीटल मित्र कीड खाईल, पिठ्या ढेकुण म्हणजे मीली बग ह्या शत्रू किडीला क्रीप्टोलीनस माॅन्ट्रीझेरी व स्कीमनस काॅक्सीव्होरा ह्या मित्रकिडी खातील. भात पिकावरील शत्रू किडींना खाणार्या अनेक मित्र कीडी असल्यातरी भात पिकावरील हजारो शत्रु किडींचा खाऊन नायनाट करण्याचा ठेका ईश्वराने बेडकांना दिला आहे. पिकावर येणार्या अनेक प्रकारच्या शत्रु किडी अळ्यांना नष्ट करण्याचे महान यज्ञ पाखरे व लाल मुंग्या करीत असतात. म्हणून आपल्याला ह्या नैसर्गिक व्यवस्थेचा उपयोग करून घ्यायचा आहे. ह्या मित्र कीडी रासायनिक शेतीतील पिकांवर अजिबात येत नाहीत. मात्र आपल्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतील पिकावर मित्र कीडी आपोआप मोठ्या संख्येने येतात व आपले पीक संरक्षणाचे काम मोफत करून देतात. परंतु त्यांना निवास करायला किंवा बसायला काही झाडे झुडुपे आवडतात व त्यावरच आकर्षित होतात. ती झाडे झुडुपे आहेत..चवळी, मका, झेंडु, तुळस, शेवगा, बाजरा, तूर, मोहरी, धणे, मेथी, गाजर, मुळे, शेवगा, कांदा बियांचे गोंडे, सोंफ, हादगा, घेवडा, वाटाणा, देशी हरभरा, उडीद, कुळीथ, मटकी, वाल ईत्यादि. ह्या सर्व आंतरपिकांचे नियोजन आपण फळबागात व पिकांत करणार आहोत.
कीड रोधक औषधांच्या फवारणीचे वेळा पत्रक —
पहिली फवारणी बी अंकुरणानंतर किंवा रोपलावणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 100 लिटर नीमास्र पाणी न मिसळता, किंवा एकरी 100 लिटर पाणी अधिक 2 लिटर ब्रम्हास्र कींवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून किंवा 15 लिटर पाणी व 300 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.
दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 125 लिटर नीमास्र पाणी न मिसळता किंवा 125 लिटर पाणी अधिक 3 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.किंवा 15 लिटर पाणी अधिक 400 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.
तीसरी फवारणी दुसर्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 150 लिटर नीमास्र किंवा एकरी 150 लिटर पाणी अधिक 4.5 साडेचार लिटर ते 5 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे किंवा 15 लिटर पाणी अधिक 500 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून मारावे,
चवथी फवारणी तीसर्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 200 लिटर पाणी अधिक 6 ते 8 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे, किंवा 15 लिटर पाणी अधिक 500 ते 600 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.
त्या नंतरच्या फवारण्या दर पंधरा दिवसांनी एकरी 200 लिटर पाणी व 6 ते 8 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून कराव्या किंवा 15 लिटर पाणी अधिक 500 ते 600 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून पुढे फलधारणा होईपावेतो सुरु ठेवाव्यात.
फवारण्या मुख्य पिकासोबतच आंतरपिकांवर व खालील जमिनीवर सुद्धा कराव्यात
साधारणता ठोकळमानाने औषधांच्या फवारण्या दर अमावशा व पोर्णिमेला कराव्यात. कारण सहसा हा काळ किडींचा अंडी टाकण्याचा असतो.
औषध फवारणीची अचूक वेळ कोणती ?—
पिकांचे किंवा फळझाडांचे दैनंदिन निरीक्षण करतांना ज्या दिवशी पानांचे मागील बाजुवर उन्हात चमकणारी किडींची अंडी किंवा लहान किडी दिसतील तर लगेच वरील औषधांच्या फवारण्या कराव्यात. जर किडींची अंडी किंवा लहान अळ्या दिसल्या नाहीत तर औषध फवारणीची आवश्यकता नाही.