पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 18

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 18

मित्रांनो,ईश्वराने मानव झाडाझुडुपासह प्रत्येक सजीवाला जसे एक प्रतिकार शक्तीचे अदभूत वरदान दिलेले आहे, तसेच स्वताची कीडनियंत्रण व्यवस्था सुद्धा उभी केली आहे..ती म्हणजे जैविक कीडनियंत्रण म्हणजे मित्रकिडींचे सहाय्याने शत्रू किडींचे नियंत्रण. ही सुद्धा ईश्वरीय अफलातून व्यवस्था आहे. दोन प्रकारच्या किडी असतात....एक शत्रू किडी व दुसर्‍या मित्र किडी. मित्र किडी संख्येने तुलनात्मक शत्रू किडीपेक्षा कमी असतात. परंतु एक एक मित्रकीड हजार शत्रू किडींना नष्ट करते. कोणत्या शत्रू किडींना कोणत्या मित्र किडीने खावे ह्याचेही नियम ईश्वराने बनवले आहेत. उदाहरणार्थ, पिकावर येणार्‍या मावा कीडीला क्रोनोब्राथा अॅफीडीव्होरा ही मित्र कीड खाईल, तुडतुडे , पांढरी माशी ह्या शत्रु किडीला क्रायसोपा कार्नीया किंवा लेडी बग बीटल मित्र कीड खाईल, पिठ्या ढेकुण म्हणजे मीली बग ह्या शत्रू किडीला क्रीप्टोलीनस माॅन्ट्रीझेरी व स्कीमनस काॅक्सीव्होरा ह्या मित्रकिडी खातील. भात पिकावरील शत्रू किडींना खाणार्‍या अनेक मित्र कीडी असल्यातरी भात पिकावरील हजारो शत्रु किडींचा खाऊन नायनाट करण्याचा ठेका ईश्वराने बेडकांना दिला आहे. पिकावर येणार्‍या अनेक प्रकारच्या शत्रु किडी अळ्यांना नष्ट करण्याचे महान यज्ञ पाखरे व लाल मुंग्या करीत असतात. म्हणून आपल्याला ह्या नैसर्गिक व्यवस्थेचा  उपयोग करून घ्यायचा आहे. ह्या मित्र कीडी रासायनिक शेतीतील पिकांवर अजिबात येत नाहीत. मात्र आपल्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतील पिकावर मित्र कीडी आपोआप मोठ्या संख्येने येतात व आपले पीक संरक्षणाचे काम मोफत करून देतात. परंतु त्यांना निवास करायला किंवा बसायला काही झाडे झुडुपे आवडतात व त्यावरच आकर्षित होतात. ती झाडे झुडुपे आहेत..चवळी, मका, झेंडु, तुळस, शेवगा, बाजरा, तूर, मोहरी, धणे, मेथी, गाजर, मुळे, शेवगा, कांदा बियांचे गोंडे, सोंफ, हादगा, घेवडा, वाटाणा, देशी हरभरा, उडीद, कुळीथ, मटकी, वाल ईत्यादि. ह्या सर्व आंतरपिकांचे नियोजन आपण फळबागात व पिकांत करणार आहोत.
कीड रोधक औषधांच्या फवारणीचे वेळा पत्रक
पहिली फवारणी बी अंकुरणानंतर किंवा रोपलावणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 100 लिटर नीमास्र पाणी न मिसळता, किंवा एकरी 100 लिटर पाणी अधिक 2 लिटर ब्रम्हास्र कींवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून किंवा 15 लिटर पाणी व 300 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किवा दशपर्णी अर्क मिसळून  फवारावे.
दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 125 लिटर नीमास्र पाणी न मिसळता किंवा 125 लिटर पाणी अधिक 3 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.किंवा 15 लिटर पाणी अधिक 400 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.
तीसरी फवारणी दुसर्‍या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 150 लिटर नीमास्र किंवा एकरी 150 लिटर पाणी अधिक 4.5 साडेचार लिटर ते 5 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे किंवा 15 लिटर पाणी अधिक 500 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून मारावे,
चवथी फवारणी तीसर्‍या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी—
एकरी 200 लिटर पाणी अधिक 6 ते 8 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नीअस्र किवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे, किंवा 15 लिटर पाणी अधिक 500 ते 600 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून फवारावे.
त्या नंतरच्या फवारण्या दर पंधरा दिवसांनी एकरी 200 लिटर पाणी व 6 ते 8 लिटर ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून कराव्या किंवा 15 लिटर पाणी अधिक 500 ते 600 मिली ब्रम्हास्र किंवा अग्नी अस्र किंवा दशपर्णी अर्क मिसळून पुढे फलधारणा होईपावेतो सुरु ठेवाव्यात.
फवारण्या मुख्य पिकासोबतच आंतरपिकांवर व खालील जमिनीवर सुद्धा कराव्यात
 साधारणता ठोकळमानाने औषधांच्या फवारण्या दर अमावशा व पोर्णिमेला कराव्यात. कारण सहसा हा काळ किडींचा अंडी टाकण्याचा असतो.
औषध फवारणीची अचूक वेळ कोणती ?
पिकांचे किंवा फळझाडांचे दैनंदिन निरीक्षण करतांना ज्या दिवशी पानांचे मागील बाजुवर उन्हात चमकणारी किडींची अंडी किंवा लहान किडी दिसतील तर लगेच वरील औषधांच्या फवारण्या कराव्यात. जर किडींची अंडी किंवा लहान अळ्या दिसल्या नाहीत तर औषध फवारणीची आवश्यकता नाही.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 17

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 17

मित्रांनो, आता महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. मी आणखी पुढील दहा दिवस हिमाचल प्रदेशात सीमला येथे आहे, तेथे पाऊस नाही, थंडी आहे. माॅडेलच्या आखणीला व बी टोकणीला सुरुवात केलेली असेलच. जे शेतकरी मित्र हे फळबागजंगल माॅडेल हमखास उभे करणार आहेत, त्यांची माझ्यासोबत विदर्भासाठी एक वेगळी बैठक दि.9 जुलै 2019 ला नागपूर येथे घेणार आहे व तसेच पुणे येथे दि.13 जुलै 2019 ला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व खाणदेशातील हे माॅडेल घेऊ ईच्छिणार्‍यांची माझ्यासोबत एक वेगळी बैठक घेणार आहे. ज्यांनी हे माॅडेल करायचे हा निर्णय पुर्णपणे घेतला आहे त्यांचेसाठीच फक्त ह्या दोन्ही बैठका आयोजित केल्या आहेत. त्यांना बैठकीचे ठिकाण व बैठकीचे स्वरुप ह्याबद्दल सरळ त्यांचे फोनवर माहिती दिली जाईल. तेव्हा, ज्यांची अंतःकरणातून हे माॅडेल उभे करण्याची तीव्र ईच्छा आहे , त्यांनी त्यांचे व्हाॅट्स अॅपवरुन माझे व्हाॅट्स अॅप नं. 9850352745 वर मला आपला पत्ता, मोबाईल नंबर, व किती क्षेत्रावर हे माॅडेल घेणार आहात ही माहिती असलेला संदेश म्हणजेच मेसेज त्वरीत पाठवावा.

पीक संरक्षण निसर्ग करेल,आपण निसर्गाला त्या नैसर्गिक प्रक्रियेत मदत करणार
निसर्गाचा एक कायदा आहे— सबलांना जगण्याचा अधिकार आहे,दुर्बलांना नाही ह्या कायद्यामागे ईश्वराचा उद्देश आहे की पुढील पिढ्या बलवान निपजून त्यांचे द्वारा जैवविविधता टिकून राहावी. 84 लाख प्रकारच्या सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या व गट ईश्वराने निर्माण केले आहेत. ह्या सर्व अन्नसाखळ्या एकमेकावर अवलंबून असतात. त्या अन्नसाखळ्यांचे आपसातील व्यवहार सुरळीत चालावे म्हणून ईश्वराने काही नियम केले आहेत. पहला नियम आहे—शाकाहारी केवळ शाकाहार करेल. दुसरा नियम आहे—शाकाहारी कोणत्याही परिस्थितीत मांसाहार करणार नाही. तिसरा नियम आहे—मांसाहारी फक्त शाकाहारीलाच खाईल. आणि चवथा नियम आहे—एक मांसाहारी दुसर्‍या मासाहारीला खाणार नाही. एक मानव सोडला तर ईतर सगळे सजीव म्हणजे पशु पक्षी झाडेझुडुपे ईश्वराचे हे नियम तंतोतंत पाळतात. उदाहरणार्थ एवढा धिप्पाड सशक्त बलवान एका झटक्यात झाडे उपडून फेकणारा हत्ती त्याचेसमोर मांसाचा ढीग लावून ठेवा, त्याला खायला गवत देऊं नका, अशा स्थितीत हत्ती उपाशी राहून भुकेने तडफडून मृत्युचा स्वीकार करेल, परंतु मांसाला स्पर्षही करणार नाही. आणि मानव ? शुद्ध शाकाहारी माकडापासून विकसित झालेला मानव , ज्याला ईश्वराने शुद्ध शाकाहारी म्हणून पृथ्वीवर पाठविले, तो आज काय काय खात नाही ? सर्वच खातो ! कोंबडी,बकरे,हले, गाय,बैल,डुकरे,पक्षी,साप सर्वच खातो,उलट भूक भागली नाही तर पैसे खातो,सडका खातो,कारखाने खातो  ! काय हे ? मानवी मांसाहार हा ईश्वराचे विरोधात केलेले बंड आहे, नास्तीकता आहे, पाखंड आहे, ईश्वरनिर्मित जैवविविधता संपवण्याचे हे मानवीय षडयंत्र आहे.
  सबलांनी जगावे व दुर्बलांनी मरावे ह्यामागे संख्यानियंत्रण हा दुसरा उद्देशसुद्धा आहे. जर दुर्बल प्राणी जगले असते व त्यांना मरण्याचे भय नसते तर पृथ्वीवर प्राण्यांची प्रचंड वसाहत झाली असती व मानवाचे अस्तित्व नष्ट झाले असते. आपल्या पिकातील सबल झाडांनीच जगावे जेणेकरुन त्यांच्या पुढील पिढ्या आणखीन सबल होतील व त्यांचा वंश टिकून राहील, परंतु दुर्बल झाडांना जगण्याचा अधिकार नाही, जेणेकरुन त्यांच्या पुढील पिढ्या आणखीन कमजोर होऊन जैवविविधताच नष्ट होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे त्या कमजोर झाडांना जगण्याचे शर्यतीतून बाद करण्यासाठी ईश्वरांने दुर्बल झाडांना खाण्याचा अधिकार व आदेश किडी व रोगांना दिलेला आहे. तसेच ईश्वराने किडी व रोगांना आदेश दिला आहे की त्यांनी सबल झाडांना हात लावूं नये, त्यांना खाण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून आपण पाहतो की जी झाडे झुडुपे किंवा रोपे कमजोर आहेत, त्यांचेवरच किडी व रोग हल्ला करतात, सबलांना नुकसान करीत नाहीत, ईश्वराचे नियमाचे तंतोतंत पालन करतात. मी हा ईश्वराचा नियम तपासून घेतला आहे, व तो तंतोतंत खरा आहे ह्याची माझी संपूर्ण खात्री पटलेली आहे, त्यामुळे माझी ईश्वरावरील श्रद्धा आणखीन प्रघाढ झाली आहे. मी अत्यंत दुर्बल रोगट कीडग्रस्त कापूस झाडांचा कापूस वेगळा वेचून त्याचे बियाणे वेगळे ठेवले व अत्यंत स्वस्थ बलवान सशक्त लटपटुन निरोगी बोंडे असलेल्या व अजिबात कीड रोग नसलेल्या सर्वोत्तम झाडांचा कापूस वेगळा वेचून ते बी वेगळे ठेवले. नंतर पावसाळ्यात हे वेगवेगळे बी वेगवेगळ्या प्रत्येकी दहा दहा गुंठे क्षेत्रावर लावले. दोन्ही प्लाॅटला कोणतेही खत दिले नाही व कोणतीही फवारणी केली नाही. फक्त तणांचे निंदण खुरपण करुन नियंत्रण केले. ह्या प्रयोगाचे निष्कर्ष डोळे फाडणारे आहेत. मला दिसून आले की मी   ज्या प्लाॅटमध्ये कमजोर रोगट कीडग्रस्त कापूस झाडापासून घेतलेले बी लावले होते त्या झाडांना किडी रोगांनी खाऊन टाकले होते, थोडेच कीडकी बोंडे होती. परंतु ज्या बलवान सशक्त कीडरोग नसलेल्या कापूस झाडांपासून घेतलेले बी दुसर्‍या प्लाॅटमध्ये लावले होते त्या झाडांना कीड रोगांचा प्रादुर्भाव अजिबात नव्हता व लटपटून बोंडे लागली होती. असे कां व्हावे ? कारण ह्या बलवान झाडामध्ये निसर्गाने भक्कम प्रतिकार शक्ती निर्माण केली होती. ह्यातून एक सिद्धांत समोर येतो की औषध फवारणी हा उपाय नसून झाडात प्रतिकार शक्ती निर्माण करणे खरा उपाय आहे. झाडांना ही प्रतिकार शक्ती जमिनीत मुळ्यासभोवती निर्माण झालेला ह्युमस देतो. व आपण जाणताच आहात की ह्युमस फक्त सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतच निर्माण होतो, अन्य रासायनिक शेतीत किंवा सेंद्रिय शेतीत किंवा वैदिक शेतीत किंवा योगिक शेतीत ह्युमस निर्माण होत नाही. जेव्हा आपण जमिनीवर दोन फळझाडांचे मध्ये पिकांच्या अवशेषांचे आच्छादन करतो , जमिनीला भरपूर जीवामृत व घनजीवामृत देतो व शेवगा तूर कडधान्यांचे आंतरपीक घेतो आणि मुळ्यांचे सान्निध्यात कायम वाफसा निर्माण करतो, तेव्हा आपोआपच ह्युमसची निर्मिती व संग्रह होतो, त्याद्वारे पिकांत व फळझाडात जबरदस्त प्रतिकार शक्ती निर्माण होते व किडी रोग येतच नाहीत. रासायनिक व सेंद्रिय दाळींबावर तेल्या व मर भरपूर प्रमाणात दिसून बागा उध्वस्त झालेल्या आहेत. परंतु आपल्या spnf नैसर्गिक दाळींब बागावर तेल्या व मर दिसत नाही. डिंक्या रोगाने रासायनिक व सेंंद्रीय संत्रा मोसंबी बागा उध्वस्त झालेल्या आहेत, परंतु आपल्या spnf नैसर्गिक संत्रा मोसंबीवर डिंक्या दिसत नाही. भुरी केवडा रोगांनी व पिठ्या ढेकूण  ने रासायनिक व सेंद्रीय द्राक्ष बागा व भाजीपाला पिके उध्वस्त झालेल्या आपण पाहतो, परंतु आपल्या spnf नैसर्गिक द्राक्ष बागावर व भाजीपाला पिकावर हे भयंकर रोग व कीड दिसत नाही. रासायनिक व सेंद्रीय कापसावर अमेरिकन बोंडअळी, मावा, पांढरी माशी व करपा मोठ्या प्रमाणात येऊन पीक उध्वस्त झालेले आपण पाहतो. परंतु आपल्या spnf नैसर्गिक कापसावर मात्र आपण बोंडअळी किडी किंवा रोग आलेले नाहीत हे आपण शिवारफेरीत पाहतो. तेव्हा मित्रांनो, सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राचा शंभर टक्के अंमल करा व आपले पीक किंवा फळझाडे कीडमुक्त व रोगमुक्त ठेवा.
      निसर्गाचा दुसरा कायदा आहे की कोणतेही शरीर आपल्या शरीरात शरीरबाह्य अनैसर्गिक मानवस्ंस्कारित पदार्थाचा प्रवेश सहन करीत नाही, त्याला स्वीकारत नाही. परिणामी हे बाहेरचे रासायनिक शेतीतून किंवा सेंद्रीय शेतीतून पिकांच्या किंवा फळझाडांचे शरीरात प्रवेश करून शरीराचे लाखो पेशीत साठविल्या गेलेले सायनिक खतांचे अवशेष,सेंद्रीय खतांचे अवशेष, कीडनाशकांचे अवशेष, अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अवशेष, गांढूळ खतातून आलेली कॅडमीयम,आर्सेनिक,पारा,शिसा ही अत्यंत विषारी जडपदार्थ व तणनाशकांचे अवशेष पेशीत विष बणून राहतात. परिणामी झाडांला प्रतिकार शक्ती देणारे उपयुक्त जीवाणू ह्या विषाने मरतात, परिणामी शरीरात प्रतिकार शक्तीच निर्माण होत नाही व मग पीक किंवा फळझाडे कीड रोगांना बळी पडतात व शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते . आपल्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीत आपण ही कोणतेही रासायनिक  खते, सेंद्रीय खते,गांढूळ खत टाकतच नाही, रासायनिक किंवा सेंद्रीय कीडनाशके व रोगनाशके तसेच तणनाशके वापरतच नाही. त्यामुळे आपल्या पिकाची किंवा फळझाडांची प्रतिकार शक्ती नष्ट होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही व कीड रोगांच्या आक्रमणाची किंचितही शक्यता राहत नाही.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 16

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 16

मित्रांनो, काल दि.24 जून 2019 ला संपलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील पांच जिल्ह्यात आयोजित तीन दिवसांच्या सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी तंत्राद्वारे विकसित केळी, पेरु,शेवगा,आंबा, लिची,ऊस,भाजीपाला, मिरची ईत्यादि पिकांच्या माॅडेल शेत पाहणी शिवारफेरीला पांच राज्यातील शेतकरी ,शास्रज्ञ व प्रसारमाध्यम प्रतिनीधींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मिडीयाने मोठे प्रसारण केले. उपस्थितामध्ये 90 % तरुण शेतकरी होते, ज्यातील 50 % तरुण शेतकर्‍यांनी यु ट्युब मधून माझे शिबीराचे व शिवार फेर्‍यांचे व्हीडीओज बघून नैसर्गिक शेतीला सुरुवातही केली होती. गम्मत म्हणजे त्यांनी माझे शिबीर ऐकले नव्हते. ह्याचा अर्थ हा की आपले जन आंदोलन शेतकरी व शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यामध्ये सामाजिक माध्यमांची म्हणजे सोशल मिडीयाची मोठी भूमिका आहे. ! का ? कारण, ती ईश्वरीय ईच्छा आहे,काळाची गरज आहे, कोणी मानो किंवा न मानो ! असो.
फळझाडांना जीवामृत कसे द्यावे 
जीवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचे सर्वोत्तम विरजण आहे. कोणतेही खत हे कोणत्याही पिकाचे कींवा फळझाडाचे अन्न नाही. त्यामुळे वरून खत टाकण्याचा प्रश्नच येत नाही. जीवामृताद्वारे आपण जमिनीत ह्युमस निर्माण करणारे अनंत कोटी सूक्ष्म जीवाणू सोडतो. हे जीवाणू मग ह्युमस निर्माण करून मुळ्यांना जे जे अन्नद्रव्य पाहीजे ते ते अन्न ह्युमसचे माध्यमातून मुळ्यांना मानवाच्या उपस्थितीशिवाय उतलब्ध करण्याचे महान कार्य करतात. अशा ह्या सूक्ष्म जीवाणूंच्या सर्वोत्तम कार्यासाठी जमिनीचे वर व जमिनीचे आत मुळ्यांच्या सान्निध्यात एका सुक्ष्म पर्यावरणाची आवश्यकता असते. हे सुक्ष्म पर्यावरण उपलब्ध असेल तरच जीवाणू ह्युमस निर्मितीचे कार्य करतात, परंतु उपलब्ध नसेल तर मात्र हे जीवाणू ह्युमस निर्मिती करीत नाहीत, चक्क समाधी घेऊन सुप्तावस्थेत dormancy जातात. काय आहे हे सूक्ष्म पर्यावरण ?
   सूक्ष्म पर्यावरण म्हणजे जमिनीचे वर दोन झाडांच्या दरम्यान वाहणार्‍या हवेचे दिवसाचे तापमान 24 ते 36 अंश शतांश असावे, त्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65 ते 72 % असावे, सूर्यप्रकाशाची तीव्रता 5000 ते 7000 फूट कंन्डल असावी व जमिनीचे आत मूळ्यांचे सान्निध्यात अंधार वाफसा स्थिती असणे, ह्या एकुणच एकात्मिक स्थितीला  सूक्ष्म पर्यावरण म्हणतात. हे सूक्ष्म पर्यावरण सूर्याचे दक्षिणायण भ्रमण काळात आपोआप निर्माण होते. हा काळ आहे..21 जून ते 20 डिसेंबर. हाच काळ झाडांच्या सर्वोत्कृष्ट वाढीचा काळ असतो व तो नैरुत्य व ईशान्य मान्सूनचा काळ असतो . म्हणजेच पावसाळ्याचा काळ असतो. ह्याचा अर्थ हा आहे की आपण रासायनिक शेतीने झालेल्या  निर्जीव जमिनीत ती पुन्हा पूर्णपणे सजीव बनविण्यासाठी पावसाळ्यात जेवढे जास्तीत जास्त जीवामृत जमिनीला पाजू, तेवढ्या जास्त वेगाने जमीन सजीव होईल व तेवढ्याच जास्त वेगाने जमिनीत ह्युमसची निर्मिती होऊन जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता सुध्दा त्याचवेगाने वाढेल. तेव्हा पावसाळ्यात जमिनीत जीवामृत जेवढे जास्त प्रमाणात देणे शक्य आहे तेवढ्या जास्त प्रमाणात द्यावे, अजिबात कंजुषी करू नये. आम्ही केलेल्या तुलनात्मक अभ्यास प्रयोगात दिसून आले की जीवामृत जमिनीवर टाकणे व सिंचनाचे पाण्यातून देणे ह्या दोन   प्रयोगात सिंचनातून दिलेल्या जीवामृताचा परिणाम कमी मिळाला, परंतु पावसाळ्यात फळझाडांच्या दोन ओळीत किंवा दोन फळझाडांत जमिनीवर टाकलेल्या जीवामृताचा परिणाम फळझाडांच्या  वाढीवर व उत्पादनावर तुलनात्मक खुपच चांगला व चमत्कारिक मिळाला. ह्यात कष्ट आहेत. परंतु हे माॅडेल ज्यांचे संपूर्ण कुटुंब फक्त शेतीउत्पन्नावर उभे आहे,ईतर कोणतेही आर्थिक स्रोत म्हणजे नोकरी किंवा व्यापार नाही, नोकरी मिळण्याची स्वप्नातही शक्यता नाही, तसेच ज्यांची कष्ट करण्याची अंतरिम तीव्र ईच्छा आहे व जो हे कार्य ईश्वरीय आध्यात्मिक कार्व आहे असे मानतो अशाच  आध्यात्मिक वृत्तीच्या तरूण शेतकरी मित्रांनी हे माॅडेल उभे करावे. नोकरी किंवा व्यवसाय करून रिकाम्या वेळात शेती करणार्‍यांनी चुकुनही हे माॅडेल उभे करण्याचे भानगडीत पडूं नये. कारण ते एकाचवेळेला दोन्हीकडे पूर्ण अपेक्षित न्याय देऊं शकत नाही.
जमिनीवर वरून जीवामृत केव्हा व किती द्यावे ?
रोप लावणी किंवा बी टोकणीनंतर पहिल्या सहा महिण्यात—जीवामृत एकाचवेळी नारळ,लिंबू,केळी,शेवगा व हादग्याला पुढील प्रमाणे द्यावे.
प्रति रोप 200 मिली जीवामृत महिण्यातून दोन तीन वेळां झाडाचे दुपारचे सावलीचे सीमेवर किंवा दोन झाडांच्या मधोमध जमिनीवर टाकावे. त्यावर माती टाकूं नये,उघडेच ठेवावे. जमीन जीवामृताला ताबडतोप शोषून घेते.
रोप लावणीनंतर किंवा बी टोकणीनंतर दुसर्‍या सहामाहीत  म्हणजे वर्षाच्या उत्तरार्धात व त्यानंतर सुद्धा वाढीचे काळात नेहमीसाठी जीवामृत किती व कसे द्यावे?
प्रति झाड 500 मिंं.ली.जीवामृत महिण्यातून दोन तीन वेळां दोन झाडांचे मधोमध जमिनीवर टाकावे. ही जीवामृत देण्याची प्रक्रिया ह्याच जीवामृत प्रमाणात जोपावेतो फळबाग उभी आहे तोपावेतो चालूं ठेवावी.
सिंचनाचे पाण्यातून जीवामृत किती द्यावे ?
सिंचनाचे पाण्यातून प्रति एकर 400 ते 600 लिटर जीवामृत महिण्यातून दोन किंवा तीन वेळां प्रत्येक पाण्यातून ह्याच प्रमाणात द्यावे.जीवामृत पातळ कापडाने प्रथम गाळून घ्यावे व नंतर पाण्यातून द्यावे. ठीबक किंवा तुषार सिंचन असेल तर जीवामृत गाळूनच वेंचुरीचे माध्यमातून द्यावे.
  एक बैल ओढेल अशी बैलबंडीची व्यवस्था करावी. बैलबंडीत दोनशे लिटर क्षमता असणारे दोन ड्राम म्हणजे बंरल एकाला लागून एक असे आडवे ठेवावे. बॅरलला वरच फक्त तोंड छिद्र जीवामृत ओतण्यासाठी असावे व बाकी छिद्र नसावे. नंतर डावीकडील ड्रामला खाली डाव्या बाजुकङील फळझाडाकडील बाजुला जीवामृत सोडण्यासाठी एक छिद्र पाडून त्यात प्लॅस्टीक नळ व त्या नळाला तोटी बसवावी. तसेच दुसर्‍या ड्रामला खाली उजव्या बाजुकडील फळझाडाकडील बाजुला जीवामृत सोडण्यासाठी बुडात एक छिद्र पाडून त्यात प्लॅस्टीक नळ व त्या नळाला तोटी बसवावी. दोन्ही ड्राम गाळलेल्या जीवामृताने भरून घ्यावे. जसा बैल किंवा हल्या किंवा गाढव प्राणी बंडी ओढणे सुरु करेल, ताबडतोप दोन्ही ड्रामच्या तोट्या हळूच थोड्या फिरवाव्या की आपोआपच फळझाडांच्या दोन्ही ओळीला जमिनीवर जीवामृत निश्चित केलेल्या धारेने पडत जाईल. जीवामृत हाताने द्यायचे असेल तर डाव्या हातात बकेटमध्ये जीवामृत घेवून उजव्या हाताने मग्ग्याचे सहाय्याने दोन झाडांचे मधोमध जमिनीवर ओतावे. किंवा पाठीवरचे पंपाचे टाकीत गाळलेले जीवामृत भरून हॅन्ढलचे नोझल काढून टाकावे व जमिनीवर हॅन्डलने जीवामृत जमिनीवर टाकावे.गाळलेले जीवामृत साठलेल्या टाकीतून मड पंपाने उचलून लांब नळ्याद्वारे जमिनीवर दोन फळझाडांचे मधोमध पाहिजे त्या प्रमाणात टाकता येते. फवारणी पंपाने जीवामृताची थेट फवारणी दोन ओळीमधील व दोन फळझाडांमधील रिकाम्या जमिनीवर सुद्धा करावी. ज्या ज्या मार्गाने जीवामृत जमिनीला भरपूर प्रमाणात पाजता येईल त्या त्या मार्गाने पाजावे. धन्यवाद.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 15

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 15

मित्रांनो, मी सध्या उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश ह्या प्रांतात शिबीरे, चर्चासत्र, चिंतन शिबीर व शिवार फेरी करतो आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनला झालेले माझे एक दिवसाचे शिबीर खूप यशस्वी झाले. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती अभियान पूर्ण राज्यात युद्ध पातळीवर राबविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवाचे नेतृत्वाखाली एक राज्यस्तरीय समिती स्थापण केली ज्यात सदस्य म्हणून सर्व मंत्रालयांचे सचिव सदस्य आहेत.माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझ्या झालेल्या पत्रकार परिषदेने सर्व प्रसार माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली. हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश व उत्तराखंड ह्या तीन राज्यांनी शेतकर्‍यांचे व जनतेच्या सर्वांगीन हीतासाठी आपले तंत्र अधिकृत सरकारी धोरण म्हणुन स्वीकारून तात्काल अंमलबजावणी सुरु केली आहे, हे आपल्या जन चळवळीला मिळालेले यश आहे. आज उद्या व परवा ता.22, 23, 24 जून 2019 ला उत्तरप्रदेशातील शामली, हापूड, मुझप्परनगर,व हस्तीनापूर जिल्ह्यांत तीन दिवसांची शिवार फेरी आहे, हरिद्वार व रुषीकेशला दर्शन व चिंतन बैठक आहे, नंतर दि. 26 जून 2019 ला उत्तराखंड कृषी विद्यापीठात होणार्‍या पदवी दान दिक्षांत समारोहात मुख्य पाहुणे म्हणून माझे भाषण आहे. नंतर दि.28 जून ते 3 जुलै 2019 दरम्यान माझे सहा दिवसांचे सोलन सीमला कृषी विद्यापीठात भव्य निवासी शिबीर हिमाचल सरकारने घेतले आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेशात दि.5,  6, 7 जुलै 2019  दरम्यान माझ्या उपस्थितीत 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने विकसित केलेल्या सफरचंदाच्या बागा व भाजीपाला माॅडेल शेतीवर तीन दिवसांची शिवार फेरी आहे ,ह्या शिवार फेरीत  हिमाचलचे माननीय राज्यपालजी व उत्तराखंड राज्याचे माननीय मुख्यमंत्री  माझेसोबत हा चमत्कार बघतील.
     आता महाराष्ट्रात मान्सूनने नाही नाही  म्हणता शेवटी आपली दया येऊन एकदाची पावसाला सुरुवात केली आहे. तेव्हा ताबडतोप माॅडेलची आखणी, खड्डे घेणे व खड्याजवळ जीवाणूमाती तयार करणे ही कामे सुरु करावी. ह्याबाबत सर्विस्तर माहिती मी ह्या आधीच्या लेखांकांत दिलेली आहेच. बी उगवून वर  येण्यासाठी आवश्यक भरपूर ओलावा जमिनीत साठलेला आहे ह्याचा अंदाज घेऊनच बियांना बीजामृताचा संस्कार करून बी टोकावे डोबावे. कमी ओलाव्यात बी टोकण्याचे अकारण धाडस करु नये, ते अंगावर येण्याची शक्यता असते. बी उगवून आल्यानंतर वाढणार्‍या रोपावर खालील वेळापत्रकानुसार जीवामृताच्या व कीडरोधक नैसर्गिक औषधांच्या फवारण्या कराव्यात.
     सतत खुरपणी, भांगलणी, निंदणी व कोळपणी म्हणजेच डवरणी करून तणांचा बंदोबस्त करावा, त्यात विनाकारण हलगर्जीपणा करू नये.  मुळात तणे मुख्य पिकाशी अन्नद्रव्ये घेण्याची स्पर्धा करतात हा कृषी विज्ञानाचा दावा खोटा आहे. तसे असते तर शेताचे बांधावर म्हणजे धुर्‍यावर व जंगलात मोठ्या झाडाखाली झुडुपे व गवताची रोपे वाढलीच नसती. परंतु आपण पाहतो की मोठ्या झाडांच्या सावलीचे मायेत झुडुपे व गवत छान वाढतात व मोठ्या झाडाला,झुडुपांना छान फळे लागतात, खालील गवताला छान दाणे लागतात. ह्याचा अर्थच हा आहे की कोणत्याही दोन झाडांमध्ये परस्पर अन्नद्रव्ये घेण्याची कोणतीही स्पर्धा नसते, उलट सहजीवन असते, एकमेकाला केलेली अन्नद्रव्यांची देवाणघेवाण असते. कोणत्याही झाडाची 98.5 % शरीर वाढ फक्त हवा, पाणी व सूर्यप्रकाशाने होते, हे तत्व आपण झाडांना देत नाही, ती ईश्वरीय व्यवस्था आहे. तेव्हा अन्न स्पर्धेचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग तुमचे मनात प्रश्न निर्माण होईल की मी निंदन खुरपण कां सांगतो आहे ? ते ह्यासाठी की कोणत्याही दोन झाडांमध्ये ओलावा व सूर्यप्रकाश घेण्याची स्पर्धा असते. जागतिक तापमान वृद्धी व हवामानात होत असलेल्या घातक बदलामुळे ह्यापुढे हमखास पावसाची व आलाच तर तो वेळेवर येईलच ह्याची कोणीही हमी देऊं शकत नाही. त्यामुळे मिळालेल्या पावसाचा जमिनीत साठलेला ओलावा टिकवून ठेवणे व त्याला बाष्पउत्सर्जन क्रियेने हवेत उडून जाऊं न देणे ह्यासाठी मी निंदन खुरपण सांगतो आहे. ह्यासाठी सायकलचे चाक असलेले हाताने चालणारे हातकोळपे म्हणजे हातडवरे खुपच चांगले. ज्यांना हवे आहे त्यांनी आपली मागणी नोंदवावी म्हणजे त्यांना ती उपलब्ध होणार्‍या पत्यांची माहिती देता येईल. एकदल गवतासारखी तणे उपटुन तेथेच आच्छादन म्हणून मोकळ्या जमिनीवर टाकलीत तर त्यांच्या मुळ्या लगेच जमिनीला चिकटतात व पुन्हा ती जिवंत होतात. म्हणून अशी एकदल तणे उचलून बांधावर वाळण्यासाठी ढीग लावा. जाड पानांची व सोटमुळे असलेली द्वीदल तणे मात्र उपटुन त्यांचे रोपाभोवती आच्छादन करावे .कारण त्यांच्या मुळ्या पुन्हा जमिनीला चिकटत नाही व जिवंत होत नाही. पुढे एकदल तणे बांधावर म्हणजेच  धुर्‍यावर वाळली की त्यांना ह्या द्वीदल तणांचे आच्छादनावर टाकावे. काडीकचर्‍याचे काष्ट आच्छादन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे व हवेतील ओलावा जमिनीत साठवून रोपांचे मुळ्यांना उपलब्ध करण्याचे अभूतपूर्व महान कार्य करीत असते. तसेच हे आच्छादन कुजून ह्युमसची निर्मिती होऊन त्या ह्युमसचेद्वारे मुळ्यांना सर्व अन्नद्रव्ये पुरविण्याचे व हवेतील ओलावा खेचून रोपांना उपलब्ध करण्याचे महत्वपूर्ण काम होत असते.
रोपावर जीवामृताच्या फवारण्यांचे वेळापत्रक—ह्या फवारण्या मुख्य पिकावर व सोबतच आंतरपिकांवर व जमिनीवर एकाचवेळी कराव्यात.
पहिली फवारणी—बी पेरणीनंतर एक महिण्याने...एकरी 100 लिटर पाणी व 5 लिटर पातळ कपड्याने गाळलेले जीवामृत. म्हणजेच 15 लिटर पाणी व 750 मिली गाळलेले जीवामृत मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी— पहिल्या फवारणी नंतर 21 दिवसांनी दूसरी फवारणी...एकरी 150 लिटर पाणी व 10 लिटर  गाळलेले जीवामृत म्हणजेच 15 लिटर पाणी व 1 लिटर जीवामृत मिसळून फवारणी करावी.
तीसरी फवारणी— दुसर्‍या फवारणीनंतर 21 दिवसांनी तिसरी फवारणी करावी त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर गाळलेले जीवामृत...म्हणजेच 15 लिटर पाणी व 1.5 दीड लिटर गाळलेले जीवामृत मिसळून फवारणी करावी
चवथी फवारणी—तीसर्‍या फवारणीनंतर 21 दिवसांनी चवथी फवारणी करावी. त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 5 लिटर जुने आंबट ताक ..म्हणजेच 15 लिटर पाणी व 400 मिली जूने आंबट ताक मिसळून मारावे.
पांचवी फवारणी—चवथ्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी पांचवी फवारणी करावी. त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर गाळलेले जीवामृत ,.म्हणजेच 15 लिटर पाणी व दीड 1.5 लिटर गाळलेले जीवामृत मिसळून फवारणी करावी.
त्या नंतरच्या जीवामृताच्या फवारण्या दर पंधरा दिवसांनी कराव्यात.— त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर जीवामृत ..,म्हणजेच 15 लिटर पाणी व दीड 1.5 लिटर जीवामृत मिसळून झाडांना पहिली फळधारणा सुरु होईपर्यंत सतत दर पंधरा दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
जीवामृत जमिनीवर देणे
पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी जीवामृत जमिनीवर किती व केव्हा टाकावे तसेच कीडरोधक नैसर्गिक औषधांच्या फवारण्या केव्हा व कशा कराव्यात, ह्याचा संपूर्ण तपशिल पुढील लेखांक नं.16 मध्ये देणार आहे. धन्यवाद.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 14

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 14

मित्रांनो, आज उर्वरित पत्ते देत आहे,त्यात नैसर्गिक लिंबू घेणार्‍यांचे पत्ते प्राधाण्यक्रमाने देत आहे, जेणेकरुन त्यांचेशी सरळ संपर्क करुन त्यांचेकडे जाऊन पिकलेली लिंबू फळे विकत घेता येतील व लगेच मागील एका लेखांकात सांगितल्या प्रमाणे बी काढून लावता येईल. बी लावूनच लिंबुची लागवड करायची आहे, जेणेकरून झाडे दीर्घजीवी होतील व दुष्काळात टिकून राहतील.
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने घेत असलेल्या लिंबू उत्पादक व ईतरांचे पत्ते—
101) उत्कृष्ठ लिंबू—श्री.डाॅ.गिरीश बोरसे,जळगांव, 9823024636,  9823246246
102) लिंबू,देशी कापूस,तूर,हळद,अद्रक— श्री.अजय महादेवराव अडचुले,मु.पो,वडाळी देशमुख ता.अकोट जि.अकोला 9922682622
103) लिंबू,तूर,संत्रा—श्री.अशोक श्रीराम हरबडे, मु.पो,भंडारज ता.अंजनगाव सुर्जी,जि.अमरावती 9766464096,   7798313253
104) लींबू—श्रीमती लक्ष्मीताई दीपक कारंजकर, मु.वाडेगाव,ता.बाळापूर, जि.अकोला 8411905111
105) लिंबू,चवळी, बंसी गहू— श्री.योगेश्वर वासुदेव चवाळे, मु.सुकळी, ता.अकोट जि.अकोला 9767925578
106) लिंबू—श्री.आशिष मुकुंद वानखडे, मु.पो.ता.संग्रामपूर जि.बुलढाणा 9404469006
107) लिंबू, दाळींब—श्री.संतोष ज्ञानदेव कदम, मु.पारगाव जोगेश्वरी ता.आष्टी, जि.बीड,9423117186
108) लिंबू, दाळींब—श्री.गणेश दत्तात्रय अनभुले, मु.पो,चोराची वाडी, ता.श्रीगोंदा, जि.नगर 9271550505
109) लिंबू,वर्षभर भाजीपाला—श्री.विश्राम बापट, मु.सावंगी मकरापूर ,मार्डी रोड,ता.चांदूर रेल्वे, जि. अमरावती 8830153471
110)  लिंबू,दाळींब—श्री.वंजी पोपट पाटील, मु.पो,तांबोळे बुद्रुक ता.चाळीसगाव जि. जळगाव 9511840090,    9503477584
111) लिंबू,दाळींब—श्री.अमोल धोंडीराम केदार, मु.रायवाडी, ता.चाकूर, जि.लातूर 9763059290, 9689356087
112) लिंबू,दाळींब,मिरची—श्री.संपत  बाजीराव गुंड, मु.पो.वाघळूज, ता,आष्टी, जि.बीड  8975057272
113) लिंबू,केळी—श्री,राजेन्द्र सिंह पाटील.मु.पो.दसेगाव शिवार,पो,मेहुणबारे, ता.चाळीसगाव जि.जळगांव 9850082006
114) कोरडवाहू लिंबू—राजशेखर निंबर्गी, मु.पो.बेकनहल्ली ता.ईंडी, जि.बीजापूर कर्नाटक 8762482005
115) लिंबू—श्री.बी.एस,पाटील, मु.पो.आरण, ता.माढा, जि.सोलापूर 9011270855
116) शेवगा ओडीसी,मका—श्री.राजेंन्द्र बालपांडे, मु.पो.ता.नरखेड,जि. नागपूर 9271624352
117) गावरानी शेवगा—श्री.नेताजी आत्माराम ताजणे,  मु.पो.सालई, ता. सावनेर जि.नागपूर 9561625471
118) शेवगा 35 एकर—श्री.मंगेश प्रभाकरराव देवहाते, मु.पो,नसीतपूर ता. मोर्शी जि.अमरावती  9960236450, 9960236452
119) लष्करी वाल, दूधमोगरा वाल शेवग्यावर सोडण्यासाठी—श्री.विष्णू चरपे, मु.पो,मेनला, ता,नरखेड जि.नागपूर 9011071147
120) पानपिंप्री, लिंबू,शेवगा—श्री.रुषीकेश गुजर, मु.पो,ता.अकोट जि.अकोला, 9867992162
121) पानपिंप्री,चवळी,तूर—श्री.संजय दूवमनजी ताठे, मु.पो,ता,शहापुरा अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 9225958209, 7218321733
122) पानपिंप्री,पानवेली, ऊस—श्री.मंगेश आवंडकर मु.पो,वडाळी,ता,अंजनगाव सुर्जी, जि,अमरावती 9561617263
123) शेवगा ओडीसी मोठे क्षेत्र—श्री.अनिकेत लिखार,मु.पो.शिरजगाव, ता.मोर्शी जि.अमरावती 8698989383
124) काळा गावरानी ऊस,लिंबू,देशी लसून,शेवगा—श्री,मनोहर लक्ष्मण पाटील, मु,पुरी, पो,बलवाडी, ता.रावेर जि.जळगाव 8983334210
125) गावरानी औरंगाबादी अद्रक,सुंठ निर्मिती,ऊस, बंसी गहू—श्री.मच्छींद्र फडतरे मु.पो.बेलवाडी ता.कराड जि.सातारा 9823723329
126) शेवगा, मिरची,हळद,अद्रक—श्री.दत्तात्रय साळुंखे, मु.पो,मोरावळे ता.जावळी, जि.सातारा 9404645925
127) शेवगा,ऊस,दाळींब—श्री.मिलींद सावंत, मु.सावंतवाडी, पो,उंडवाडी, ता.बारामती जि.पुणे 9011617720,  7588032570
128) शेवगा!मिरची,ऊस,दाळींब—श्री,रणधीर पाटील, मु.पो,सुंदरगव्हाण जि. नंदुरबार 7020606819, 8698212521
129) गावरानी वायगाव हळद—श्री.महेश चंद्रकांत हिवसे, मु.पो.मुरादपूर ता.समुद्रपूर जि.वर्धा  9257129125
130) गावरानी वायगांव हळद—श्री.शंकरराव घुमडे, मु.पौ.वायगाव हळद्या ता.समुद्रपूर जि.वर्धा 9689219066
131) गावरानी राजापुरी हळद, शेवगा,ऊस, बंसी गहु—श्री.नानासाहेब भीमराव पाटील मु.पो.गव्हाण ता.तासगिंव जि.सांगली   9284695969
132) गावरानी वायगाव हळद,तूर,वर्षभर भाजीपाला—श्री.नरेंद्र पुसदेकर मु.पो.नारायणपूर ता.समूद्रपूर जि.वर्धा 9923343785
133) गावरानी वायगाव हळद,गावरानी लसून,तूर, बंसी गहू—श्री.सुदाम नंदनवार, मु.पो.ता.हिंगणघाट जि.वर्धा 8888222218
134) गावरानी अंबाडी भाजीची—श्री.गणेशअप्पा रुद्रवार, मंगलमुर्तीनगर, कारेगाव रोड, परभणी,9545933327
135) काळी मिरची,वायगाव हळद,गजरा तूर—श्री,मंगेश बावने मु.पो,आर्वी फरीदपूर ता.समुद्रपूर जि.वर्धा संपर्कासाठी मोबा.9049767968
136) देशी तूर—श्री.दत्तात्रय मिरासे, मु.पो.ता.जी.यवतमाळ 9075638565
137) गावरानी मिरची—श्री.बाळासाहेब जाधव, मु.पो.शिवराई, ता.वैजापुर जि.औरंगाबाद 9421419591,  9923241664
138) देशी मिरची रेशीमपट्टा जात— श्री.अमित कोयानी, मु.पो,जाम कंडोरना, जि.राजकोट गुजरात 9925134624
139) गावरानी औरंगाबादी अद्रक— श्री.अंकूश साहेबराव म्हसके, मु.कान्हेरी, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद 9421664739
140) गावरानी धणे, हळद, बंसी गहू—श्री.चेतन पुरुषोत्तम वाभीटकर, मु.करंजी सोनाबाई, ता.राळेगाव जि.यवतमाळ, 7218567745,   9657604300
141) शेवगा,अद्रक,हळद—श्री.दादासाहेब झाडे, मु.चिंचोली, ता.सिन्नर जि.नाशिक 9881330114
142) शेवगा,बहुवार्षीक तूर,दाळींब—श्री.सुभाष विठ्ठल जाधव, मु.हवंचल,ता. दिंडोरी, जि.नाशिक 9373991112
143) शेवगा,कुळीथ,तूर, दाळींब—श्री,गणेश अप्पा चौधरी, मु.पो.वडझिरे, ता.पारनेर जि.नगर 9881365725
144) शेवगा,ऊस, दाळींब—श्री.विजय शिवाजी यादव, मु.पो,हिंगणी बेर्डी, ता.दौंड, जि.पुणे 9922672333
145) शेवगा,चवळी,दाळींब—अमृत खेडकर मु.सारदे. ता.सटाणा, जि.नाशिक 7767932277
146) शेवगा,चवळी,दाळींब—श्री.सुभाष अहेर, मु.पो.ताकनळी, ता.कोपरगाव जि.नगर 9822626251
147) शेवगा,पपई,दाळींब—गणेश सोनवणे,मु.विटाळी, पो.धानोरा,ता.नांदुरा, जि.बुलढाणा 8606533779
148) गावरानी मिरची कामखेडा जात—श्री.संजय सहदेवराव जाधव मु.पो.पट्टीवडगाव भवानवाडी, ता.अंबाजोगाई, जि.बीड 9404888812
149) नैसर्गिक पानमळा—श्री.नानासाहेब शिवाजी खोत, मु.पौ.आरग ता.मिरज,जि.सांगली 9975176199
150) कोरडवाहू लाल दाण्याच्या पौष्टीक पेरभात जाती उपलब्ध आहेत—श्रीमती नागीनबाई दामोदर कांबळे,मु.खेर्डा खुर्द ता.उदगीर जि.लातूर    7030237571 श्रीमती शारदाताई बालाजी करवंदे मु.भातखेडा ता.जि.लातूर  7775002416

     जवळपास सर्व बी उपलब्ध होईल अशी यादी आतापर्यंत दिलेली आहे. तेव्हा त्यांचेशी फोनवर संपर्क करून त्या त्या बीजधारकाची वेळ घेऊन स्वता जाऊन बी ताब्यात घ्या. भाव आपसात बोलून निश्चित करा. बी लावण्यासाठी जून जुलै महिने उपलब्ध आहेत. कंद व रोपे आगष्टचे उत्तरार्धात ते सप्टेंबरचे पुर्वार्धात लावायची आहेत. बियाच्या द्राक्षाचे छाटकलम आपण आॅक्टोंबर मध्ये लावणार आहोत. ऊस आॅक्टोंबर नोव्हेंबरमध्ये लावायचा आहे. त्याआधी ऊस लावायच्या दर सहा फुटावरील चौफुल्यांवर जून जुलै मध्ये पावसाला सुरुवात होताच बाजरा मका,चवळी मूंग ऊडीद तीळ ह्यांचे बीजमिश्रण टोकून डोबून द्या, म्हणजे ऊस लावण्याआधी एक पीक आपल्या हाती येऊन जाते व उसासाठी सुंदर बिवड तयार मिळतो, त्यामुळे उसाचे सुरुवातीची वाढ सुंदर व जोमाने होते.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 13

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 13

मित्रांनो, मी आता उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडूनला आहे. आज मुख्यमंत्री, ईतर मंत्री, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु व शास्रज्ञ, पूर्ण राज्यातून अधिकारी व प्रत्येक विकासखंडातून निवडलेले शेतकरी ह्यांच्या सोबत माझे दिवसभर शिबीर आहे.....त्यामुळे वेळात वेळ काढून हा लेखांक नं.13 सादर करतो आहे. आज सुद्धा काही महत्वाचे पत्ते व मोबाईल नंबर देत आहे, जेणेकरुन त्यांचेकडून बी किंवा रोपे मागवता येईल. मी दिलेल्या पत्यावरील शेतकरी दिलेली नैसर्गिक पिके मागीलवर्षी करीत होते. दुष्काळामुळे आज कदाचित पिकात बदल केला असेल, तर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून खात्री करावी.
51) सचिन झाडे कमलनयन बजाज फौंडेशन वर्धा, चटणी शरबताची लाल अंबाडी, भाजीची पांढर्‍या बोंडांची अंबाडी, गावरानी वायगाव हळद,जवस, गावरानी काशी टमाटे,गावरानी गजरा तूर, झुडुपी वाल, पोपटी वाल, जांभळा वाल,गावरानी काटेरी वांगे, गावरानी बीन काट्याचे वांगे,गावरानी सुगंधी धणे,चनोली हरभरा,गावरानी वाणी ज्वारी, गावराणी रिंगणी ज्वारी...ईत्यादि बी उपलब्ध होईल.संपर्क नंबर 8805009737
52) देशी केळी व अद्रक— श्री.प्रकाश शंकर ढाणे,मु.पो.पाडळी निजाम, ता.जि.सातारा, 9665303137
53) देशी केळी व दाळींबाची सुंदर स्वादीष्ट औषधी जात गणेश—श्री.समाधान सीताराम मगर मु.पो,वासूद अकोला, सांगोला सूत गिरणीजवळ, ता,सांगोला, जि.सोलापूर 9922521627
54) गावरानी बसराई केळी,शेवगा—श्री.प्रसाद आर्वेला, मु.पोही ,ता.कळमेश्वर, जि.नागपूर 9404956466
55) देशी वसई केळी,शेवगा—श्री.राजेश मच्छले,मु.खंडाळा मुरंबी, ता,पारशिवणी,जि.नागपूर 9552637425
56) देशी केळी,हळद,ऊस—श्री.सातप्या माळी,मु.पो,ता,कागल,जि . कोल्हापूर 9404974471
57) देशी केळी,अद्रक,मिरची—श्री.आनंदराव दळवी,मु.पो.पाली खंडोबाची ता.कराड, जि.सातारा 9765382965
58) देशी केळी,पानमळा,ऊस 12 फूट पट्टा,—श्री.संतोष भगवान रेवटे, मु.पो.आर्वी,ता.कोरेगाव जि.सातारा 9021350237
59) देशी विलायची केळी,देशी केळी,शेवगा, लिंबू—श्री.रमेश महादेव बोळकोटगी, मु.पो.टाकळी,ता.जि.सातारा 9869061242
60) देशी केळी,ऊस—श्री.प्रवीण थोरात,मु.पो.कारवे ता.कराड जि.सातारा 9325398067
61) देशी केळी—श्री,महावीर पाटील,मु.पो,नरवाड ता.मिरज,जि,सांगली 9595576256
62) देशी केळी कंद उपलब्ध—श्री.महेश घुले, मु.पो.मांजरी बुद्रुक ता.हवेली,जि.पुणे,9623467646
63) देशी केळी,जी नाईन केळी,ऊस—श्री.प्रकाश जगदाळे,मु.पो.सराटी,ता. ईंदापूर जि.पुणे   9657496111
64) देशी केळी कंद उपलब्ध—श्री.मल्लीकार्जून नरोनी,मु.हत्तरसंग,कुडल संगम,ता.द.सोलापूर जि,सोलापूर
9096992846
65) देशी केळी,देशी शेवगा—श्री.मच्छींद्र फडतरे,मु.बेलवाडी,ता,कराड, जि.सातारा,  9511742454
66) देशी केळीचे कंद उपलब्धीसाठी संपर्क करा.,चंद्रशेखर काडादी मु.पो.हुलसूर ,ता.बसवकल्याण जी.बीदर कर्नाटक, मराठीतून बोला
67) देशी केळीसाठी हिंदीतून संपर्क करा—श्री.प्रसन्न मुर्ती, तुमकूर, कर्नाटक 8453620641
68) देशी केळीसाठी ईंग्रजीत संपर्क करा—श्री.सुब्रमनी रेड्डी, बंगलोर कर्नाटक,9980530197
69) देशी केळीसाठी हिंदीत संपर्क करा—श्री.विजय राम, हैदराबाद, तेलंगणा, द्वारा सुरेंद्र 9949190769
70) देशी केळीसाठी ईंग्रजीत संपर्क करा—श्री.कुरीयनजी, कोट्टायम, केरळ 9446530839
71) देशी केळीसाठी कोंकणात मराठीत संपर्क करा—श्री.प्रकाश दातार 7038293839, श्री.दत्तराव शेलार 9527402724, 9403366585, श्रीमती स्मीता दळवी 9404993416. श्री.सुरेश पवार 9145043223, श्री,प्रमोद विचारे 9167671785, श्री.सदाशीव चव्हाण सुप्रिया नर्सरी,9421016320,श्री.निलेश पेडनेकर 9421645796, श्री.अनंत सावंत 9404162541, डाॅ.मंदार गिते 9422595512,, सई निकम 8080229007, श्री,संजीव म्हात्रे
9969899085
72) जीवामृतावरील देशी केळी,करवंद व देशी नारळ—डाॅ.आनंद कोपरकर,कोपरकर नर्सरी,दापोली, जि.रत्नागिरी 9422431258, डाॅ.सुहास कोपरकर 9422431265
73) जीवामृतावरील देशी केळी,देशी नारळ,करवंद
आशिका नर्सरी,श्री.अरविंद अन्ना अमृते, दापोली, जि.रत्नागिरी 9422443740
74) केळी,दाळींब—श्री.ज्ञानेश्वर हरीश्चंद्र सुकळकर, मु.पो.तुरखेड ता.अंजनगाव सुर्जी, जी.अमरावती
9767993986
75) केळी तूर मोसंबी—श्री,रुपेश आगरकर मु.पौ,लोणी,ता.वरुड जि.अमरावती 9403882816
76) देशी केळी,शेवगा,ऊस,खपली गहू,अनेक देशी जातींचे संकलन
श्री.समीर राजाराम झांजुर्णे,मु.पो,तडवळे ता.कोरेगाव जि.सातारा 9922910326
77) केळी—अमित डेहनकर, मु.पो,तळेगाव दशसहस्र,ता.चांदूर रेल्वे जि.अमरावती 9673689161
78) केळी,अद्रक,हळद—श्री.किशोर राऊत,मु.पो,बोरगाव दोरी ता.अचलपूर जि.अमरावती 9422354930
79) केळी—श्री.शिवाजीराव देशमुख,मु.पो.बारड ता.मूदखेड जि.नांदेड 9763631122
80) केळी—श्री.विश्वेश रावेरकर, मु.पो.ता.रावेर जि.जळगाव 9881737970,  8329325774
81) केळी—श्री.हर्षल चौधरी मु.पो.आव्हाणे,ता.जि.जळगाव 7218983534
82) केळी—श्री.दीपक महाजन,मु.पो.नगरदेवळा,ता.पाचोरा ,जि,जळगाव 9975696910
83) केळी—श्री.विष्णू भिरुड मु.पो.निंभोरा, ता.रावेर जि.जळगाव 9764277708,  9975168530
84) केळी कंद उपलब्ध—श्री.विनोद बोरसे,मु.पो.पिचरडे ता.भडगांव जि.जळगाव 9272159264
85)  केळी,शेवगा—श्री.संदीप धनगर मु.पो.चांदसनी,ता.चोपडा,जि.जळगाव 9765464343
86) केळी—श्री.योगेश लोखंडे,मु.पो.अट्रावल ता.यावल जि.जळगाव 9373412818
87) केळी अद्रक—श्री.राजेश माचेवार,मु.पो.अकोली जहागीर ता.अकोट जि.अकोला 9765173815
88) देशी केळी,पपई,वर्षभर नेसर्गिक भाजीपाला—श्री.गजानन मानकर मु.दापोली, ता.देवळी,जि.वर्धा
8390087224
89) केळी कंद उपलब्ध आहेत—श्री.गंगाधर गाढवे, मु.पो,भीमा टाकळी,ता,शिरुर जि.पुणे
9673199033,   9604528858
90) केळी अद्रक—श्री.निलेश अकोटकर मु.पो.लोणी बेनोडा ता,वरुड जि,अमरावती 7721090028
91) केळी—श्री.अरुणपंत ईरवे,मु.पो,वाडेगाव ता.वरुड जि.अमरावती 7798239854
92) केळी,ऊस,हळद,संत्रा—श्री.मृदगल जायले, मु.मक्रमपूर पो.उमरा,ता,अकोट,जि.अकोला 9850630578,  7391929308
93) केळी,संत्रा—श्री.महेंद्र मिरगे, मु.पो,सौंदळा ता.तेल्हारा जि.अकोला 9822542330
94) केळी शेवगा—श्री.प्रशांत थोरात मु.पो.ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 9421787641
95) ऊस रसवती व गूळाचा 419—श्री.जयसिंह ज्ञानोबा फरांदे, मु.पो. आनेवाडी ता.जावळी, जि.सातारा
9922640341
96) केळी,ऊस—श्री.सतीष खुबाळकर मु.पौ.खुबाळा ता.सावनेर जि.नागपूर 9552106538
97) केळी शेवगा—श्री.महादेव माळी,मु.पो.माळी मळा,सुपने,ता.कराड जि.सातारा 7588685967
98) देशी लाल रसवंतीचा ऊस, अद्रक—श्री.अरूण माने,मु.पो.रहीमतपूर ता.कोरेगाव जि.सातारा 9860298578
99) केळी कंद उपलब्ध आहेत— श्री.अंकूश धाबेकर, मु.पो.नांदा ता.कोपरना जि.चंद्रपूर 9067526572
100) हादगा रोपे—अमर नळे,नर्सरी. मु.पो,आष्टगाव ता.राहाता जि.नगर 9822910195
 धन्यवाद

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 12

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 12

मित्रांनो, आजपावेतो दिलेले सर्व बारा लेखांक आपण वाचले असतीलच. जर कोणता लेखांक उपलब्ध झाला नसेल तर मला माझे वरील व्हाॅट्स अॅप नं.9850352745 वर आपल्या व्हाॅट्स अॅप नंबरवरुन संदेश पाठवावा. म्हणजे मला तो लेखांक पाठविता म्हणजे फाॅरवर्ड करता येईल. आपली माॅडेल उभे करण्याची पूर्वतयारी झालेलीच असेल. नसेल तर लगेच करावी. मुख्य पाऊल म्हणजे बी किंवा रोपे हाताशी करणे. त्यासंबंधात खालील पत्यावर संपर्क करा. बी जून जुलै मध्ये लावायचे आहे व रोपे आगष्ट सप्टेंबर मध्ये व द्राक्ष छाटकलम आॅक्टोंबर मध्ये लावायचे आहे, पर्याप्त वेळ हाताशी आहे. ह्या माॅडेलमध्ये असे नियोजन केले आहे की आपण शेतात लागणारी सर्व संसाधने व घरी खाण्यासाठी लागणारे सर्व अन्नधान्य ह्या माॅडेलमध्येच सतत उपलब्ध होत राहतील. ह्या एक एकरच्या माॅडेलमध्ये मसाला पदार्थ उपलब्धीसाठी आपण एकदोन ठिकाणी एक एक रोप दालचीनी, जाळफळ, लवंग, विलायची, काळी मिरी, तमालपत्र, गोडनींब, नागेशर सुद्धा प्रयोग म्हणून लावणार आहोत.
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने पिकविलेले बी किंवा कंद किंवा रोपे कुठे मिळतील ?
1) गावरानी कोरडवाहू बहुवार्षिक शेवगा—  श्री.शिराक पटेल,मु.देवकलोलता.जेठपूर जि.राजकोट सौराष्ट्र गुजरात 9725771135,  श्री.जे पी कोटाडीया 9825487797 श्री.तुषारभाई पीथीया 9898142113
2) श्री.प्रकाश लहासे, गावरानी बहुवार्षिक शेवगा, स्वदेशी कापूस, मु.पो.पहूर ता.जामनेर जि.जळगांव
9423937136
3) श्री.सुनिल शिंदे शेवगा,मु.पो.बावी ता.वाशी जि.उस्मानाबाद 9623687111
4) श्री.भगवान रामराव जाधव, शेवगा,ऊस,दाळींब मु.कौडगांव ता.अंबड जि.जालना 8308677207
5) श्री.भाऊराव आसाराम चव्हाण,शेवगा मोसंबी,मु.गोला,ता.अंबड जि,जालना 9422229177
6) श्री.राजेंन्द्र अण्णाप्पा धनवडे, शेवगा,
ऊस,केळी,मु.पो.जरळी, ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर 7038227198
7) श्री.बाबासाहेब भाऊसाहेब फोपसे, शेवगा, ऊस, लसून, पपई, मु.पो.तामसवाडी ता.नेवासा जि.नगर
9404978491
8) श्री.आर.एन.महाजन, शेवगा, केळी, मु.वाडे ता.भडगांव जि.जळगांव 9422275264
9) श्री.संदीप धनगर, शेवगा,केळी, मु.चांदसनी, ता.चोपडा, जि.जळगाव 9765464343
10) श्री,मनोज काशीनाथ पाटील, शेवगा, अद्रक,खपली गहू, मु.लोणी अडावद ता.चोपडा जि.जळगांव
9423977272,  9823010521
11) श्री.महम्मद हनीफ, शेवगा,तूर, मु.अलूर ता,ऊमरगा,जि.उस्मानाबाद 9921580808-भाऊ अब्दूल
12) श्री.नानाराव लिंबाजी घुगे, शेवगा, हळद,एरंड,लसून,बंसी गहू,दाळींब,मु.पो. वासंबा, ता,जि.हिंगोली 9420885802
13) श्री.शिवराज दादासाहेब कडू, शेवगा, ऊस,गूळ,चवळी,दाळींब, मु.पो.बाभूळखेडा, ता.नेवासा, जि.नगर
7776061951
14) श्री.विलास भानुदास लबडे, शेवगा, चवळी,दाळींब मु.गोंधवणी,ता.श्रीरामपूर जि.नगर    9822499060
15) श्री.वैभव अशोक नवले, शेवगा ओडीसी, हळद,पपई,भाजीपाला, मु.पो.आढळगांव ता.श्रीगोंदा जि.नगर
8691999333
16) श्री.सुहास बाळासाहेब पवार,शेवगा, लिंबू, ऊस,दाळींब, मु.पो.विळद ता.जि.नगर  8796955862
17) श्री,अमोल सीताराम मोरे, युवराज लोंढे, शेवगा,,लिंबू, ऊस,जवस, कुळीथ, खपली गहू,दाळींब,मु.पो,भांबोरा ता.कर्जत जि.नगर 9890763455, 9763133874
18) श्री.प्रदीप पोपटराव बारवकर,शेवगा, मिरची,ऊस, दाळींब, मु.विठ्ठलवाडी देऊळगाव, ता.दौंड जि.पुणे
9665733782
19) श्री.गणेश बाळासाहेब सासवडे, शेवगा, ऊस, भाजीपाला, बंसी गहू मु.पो.पिंपळे जगताप,ता.शिरूर जि.पुणे
9923545252
20) श्री.नीतीन सावंत, शेवगा, मु.कुंडलपूर ता.तासगाव जि.सांगली 7887486673
21) श्री.अशोक भांगे, शेवगा ओडीसी,मु. शेटफळ ता.मोहोळ जि.सोलापूर 7972669277
22) श्री.महेश पवार, शेवगा ओडीसी, ऊत्पादन व निर्यात करतात, मु.पो.पवारवाडी,रावळगाव चाॅकलेट कारखाना जवळ, ता.मालेगाव जि.नाशिक 7218983431,   9764266447
23) श्री.प्रशांत पवार, शेवगा, मु.बेलकुंड ता.औसा जि.लातूर 9767836513
24) श्री.गोकूळ बाबासाहेब जाधव, शेवगा, दाळींब, मु.पो.कंडारी, ता.परांडा. जि. उस्मानाबाद 9970460143
25) श्री.ताणाजी सरगर, शेवगा दाळींब, मु.पो.बाज ता.जत जि.सांगली 9011037500
26) श्री.किशोर काळे, शेवगा वसंत जात 12 एकर उत्पादन व निर्यात करतात.
मु.पो.पिलीव, ता.माळशिरस जि.सोलापूर 9309748907
27) श्री.भरतसिंग राजपूत, शेवगा, गावरानी फाफडा मिरची, दाळींब, मु.वैंदाणे, ता.जि.नंदुरबार 7744012774
28) श्री.समाधान ठुबे, शेवगा,दाळींब, मु.पो.पिंपरखेड, ता.चाळीसगाव जि.जळगाव 9860626810
29) सौ.मनीषाताई अरुणपंत जाधव, शेवगा, चवळी, मु.पो.लांबोटा, ता.निलंगा जि.लातूर 8380080091
30) श्री.नामदेव बाबुराव घाडगे, शेवगा, दाळींब,मु.धोंडीवाडी, ता.खटाव जि.सातारा 9922417745
31) श्री.दीपक हनुमंत वाघ, शेवगा, ऊस, दाळींब, मु.पो.वाठार बुद्रुक ता.खंडाळा जि.सातारा  8530753827
32) श्री.विठ्ठलराव जाधव, शेवगा, अद्रक, मु.सावरगाव, ता.मानवत, जि.परभणी 9767977296
33) श्री.सोपान विठ्ठलराव आभाळे, शेवगा,दाळींब, मु.पो.मढी खुर्द, ता.कोपरगाव जि.नगर 9422181117
34) श्री.संदीप गाडे पाटील, शेवगा,दाळींब मु.भिंगारे ता.येवला जि.नाशिक, 9921163270,    9657150777
35) श्री.संजय सागर, शेवगा, दाळींब, मु.सागर मळा, पो,ता.आटपाडी, जि.सांगली  9420453820
36) श्री.शामराव पवार, शेवगा,ऊस, दाळींब, मु.पो.कुप्पा, ता.वडवणी, जि.बीड 9637985574, 7499092993
37) श्री.विलास नारायण भरगुडे, शेवगा,ऊस,केळी,पपई, मु.पो.पळशी ता.खंडाळा, जि.सातारा 9921580122
38) श्री.दत्ता ईंदलकर, शेवगा, मु.चव्हाणवाडी,पो.टेंभूर्णी,ता.माढा, जि.सोलापूर 9766307755
39) श्री.शहाजी पवार, शेवगा, केळी,मु.पौ पाटसावंगी, ता,भूम जि.उस्मानाबाद 7350181104
40) श्री.सुरज पंचबुध्ये, शेवगा, केळी, हळद,मु.हिवरी खेत, ता.तेल्हारा जि.अकोला 9970072962
41) श्री.दिलीप पाथरे,शेवगा, संत्रा, मु.पो.हनुमंतखेडा, ता.अचलपूर जि.9096806841
42) श्री.बाळासाहेब उभाळ, शेवगा, हळद, संत्रा, मु.पो.भिलोना,ता.अचलपूर जि.अमरावती, 9064339033
43) श्री.रविंद्र भुयार, शेवगा,हळद,अद्रक, केळी,पसर्‍या भुईमूंग, वर्षभर भाजीपाला, गावरानी मिरची ,मु.पो.येणी पांढरी ता.अचलपूर जि.अमरावती  9765034506  9766936558
44) श्री.शशीकांत निचीत, शेवगा, ऊस, भाजीपाला, मु.पौ.वडनेर खुर्द,ता.शिरूर जि.पुणे 9767352247
45) श्री.ज्ञानेश्वर जगताप,शेवगा, मु.पौ.पिंपळगाव बसवंत जि.नाशिक 9921696464    8308124719
46) श्री.सुहास दादा फुले , शेवगा,हादगा, केळी,मु.पो.मोरोची, ता.माळशिरस, जि,सोलापूर 9421029024,   8975737226
47) श्री.मधुकर पीसाळ, शेवगा वसंत, झुडुपी चवळी, मु.पो.होळ ता.बारामती, जि.पुणे, 9373589233
48) श्री.शरद शिंदे, देशी शेवगा ओडीसी, नारळ,झुडुपी चवळी, दाळींब, मु.पो.मोडनिंब, ता.माढा, जि.पुणे
9028598955
49) श्री.अनिरुद्ध पाटील, शेवगा,दाळींब, मु.पो.तारसाळी, ता.सटाणा, जि.नाशिक 9921242995
50) श्री,मच्छींद्र फडतरे, देशी शेवगा, देशी केळी मु.पो.बेलवाडी, ता.कराड जि.सातारा  9511742454

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 11

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 11

मित्रांनो, आपण माॅडेलचे सीमेवर चारही बाजुंनी करवंदाचे जैविक कुंपन व वारा प्रतिबंधक जैविक पट्टा घेणार आहोत. त्यांत करवंद व सुरुसोबतच पीक संरक्षणासाठी आपण वापरणार असलेल्या दशपर्णी, अग्नीअस्र ब्रम्हास्र नीमास्र ह्या वनस्पतीजन्य औषधे निर्मितीसाठी आवश्यक औषधी वनस्पतीं लागवडीचे नियोजनसुद्धा करणार आहोत. माॅडेल शेताचे सीमेवर  एक एक कडुनींब, करंज, बेल, रामफळ ह्यांची रोपे किंवा बी चार कोपर्‍यात लावावे. तसेच ह्याच सीमेवर काही ठिकाणी अधुनमधून दोन करवंदाचे मधोमध सुरूचे जागेवर सीताफळ,धोतरा, रूई, एरंड, पपई, नीरगुंडी,तुळस, कन्हेर, जास्वंद ह्यांचे बी किंवा छाटकलम लावावे. म्हणजे हे सर्व साहित्य आपल्याच माॅडेलमध्ये दरवर्षी उपलब्ध होईल. सौराष्ट्र गुजरातमध्ये सदा दुष्काळी पट्ट्यात मी प्रत्येक कोरडवाहू शेताच्या संपूर्ण बांधावर म्हणजे धुर्‍यावर अनेक वर्ष फक्त पावसावर उत्पादन देणारा गावरानी बहुवार्षीक आखूड पण जाड चवदार पौष्टीक औषधी शेंगाचा शेवगा बघितला. त्या शेवग्याची पाने व शेंगा मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते व शेतकर्‍यांना जास्तीचे पण बीनाकष्टाचे भरपूर उत्पन्न मिळते. आपण सुद्धा हा गावरानी शेवगा करवंदाचे मध्ये अठरा फुटावर लावणार आहोत. प्रत्येकी तीन चौफुल्या  हादग्यासाठी सोडून चवथ्या चौफुलीवर हादग्याचेऐवजी हा गावरानी शेवगा आपण लावणार आहोत. एकरी एकूण हादग्याची 220 रोपे हवी होती. परंतु आता दर तीन हादग्यानंतर एक हा  गावरानी शेवगा लावणार असल्यामुळे एकचतुर्थांश म्हणजे 55 झाडे शेवग्याची व तीनचतुर्थांश म्हणजे 115 झाडे हादग्याची बसणार आहेत.
      मी सौराष्ट्र  गुजरातमधून ह्या गावरानी शेवग्याचे बी मागविलेले आहे, ते नंतर आपणाला वितरित केले जाईल. फक्त व फक्त हे माॅडेल उभे करू ईच्छिणार्‍या ज्यांना हे गावरानी शेवग्याचे बी पाहीजे व किती पाहीजे ही माहिती आपल्या पत्ता ,मोबाईल नं. व माॅडेलचे किती क्षेत्र नियोजित आहे ही माहिती मला माझ्या व्हाॅट्स अॅप नंबर 9850352745 वर पाठवावी. ज्यांची मागणी लवकर येईल त्यांनाच हे बी उपलब्ध होणार आहे. हे बी जून जुलै मध्ये केव्हीही सोयीनुसार लावता  येईल.
    हादग्याचे झाडाची उंची 9 फुटावर गेली की वरचा शेंडा कापून टाका. म्हणजे हादग्याचे खोडाला सभोवती आडव्या फांद्या फुटतात. त्यामुळे हे जैविक कुंपन दाट होते व ह्या फांद्यावर द्राक्ष वेली सोडायला सोयीचे होणार आहे व ह्या शेंडा छाटणीमुळे हादग्याचे खोड मजबूत होते, घेर वाढतो व द्राक्ष घडांचे वजन सहन करण्याला सक्षम होतात.
 ईतर झाडप्रकारांत एकरी किती झाडे बसतात
नारळ— 75, लिंबू— 150,  सागाचे ऐवजी देशी शेवगा—75, केळी—600, सुधारित पीकेएम किंवा ओडीसी शेवगा—300 , हादगा—1200, मिरची—2400, झेंडू—4800, तूर+ अंबाडी..1600, कापूस— 1600, द्राक्ष छाट कलम—1200, तसेच—गावरानी वायगाव हळद, गावरानी अद्रक, तंबाखु, गावरानी लसून, वाघ्या घेवडा,काळा घेवडा,पांढरा घेवडा, झुडुपी चवळी, कांदा, जीरा,मोहरी
देशी धणे, देशी पसर्‍या भुईमूंग,देशी बाजरा, मूंग, ऊडीद, मका, मटकी, कुळीथ, तूर,कापूस,अंबाडी, गावरानी ज्वारी, व ईतर आवश्यक बी मिळवून ठेवा. ह्या बियाण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क करून बी लगेच ताब्यात घ्या.
बी किंवा रोपे उपलब्धी साठी संपर्क
1) श्री.मनोज गायधणे,लाल शरबताची व चटणीची अंबाडी, देशी वायगाव हळद, मु.खैरगाव,पो.वायगाव हळद्या,ता.समुद्रपूर ,जिं.वर्धा 9834067247
2)श्री.गणेशप्पा रुद्रवार, गावरानी भाजीची व तेलाची अंबाडी,मंगलमुर्ती नगर,कारेगाव रोड, परभणी  9545933327,
3) श्री.अनिल गवळी, भाजीची,तेलाची,चटणीची,व शरबताची अंबाडी, पंढरपूर जि.सोलापूर 9767767499
4) श्री.संजय कुळकर्णी, भाजीची व तेलाची गावरानी अंबाडी,सूर्यफूल, चटणीचे बारके कारळे,भगर,हिरवा गावरानी वेल्या मूंग,मु.माळकोंडजी,ता.औसा जी.लातूर
8888142431
5) श्री.विजयसिंह घोरपडे देशी पांच महिण्यात येणारा पसर्‍या भुईमूंग,मु.भाळवणी,ता.खानापूर जि.सांगली,9552765509,  8698737200
6) श्री.शिवशंकर बीराजदार,गावरानी पसर्‍या उन्हाळी भूईमूंग ,मु.सुलतानपूर ता.अक्कलकोट जि.सोलापूर 8329052179,  9766267884
7) श्री.संदीप चंद्रकांत पाटील, देशी पसर्‍या पांच महिण्यात येणारा भुईमूंग,मु.पो.ता.कवठेमहांकाळ जि.सांगली 8275914219,  9284067801
  ह्या माॅडेलमध्ये दर तीन फुटावर येणार्‍या दोन ओळींचे मधोमध हा गावरानी पसर्‍या भुईमूंग अधिक बाजरा अधिक वरी म्हणजे भगर अधिक सूर्यफूल हे बीजमिश्रण पेरावे किंवा चौफुलीवर टोकावे.
8) श्री.सुदाम नंदनवार,देशी वायगांव हळद,गावरानी लसून,तूर, बंसी गहू,मु.पो.ता.हिंगणघाट जिं.वर्धा
8888222218
9)श्री.नरेंद्र पुसदेकर, देशी वायगाव हळद, तूर,वर्षभर भाजीपाला, मु.नारायणपूर ता.समुद्रपूर जि.वर्धा 9923343785
10) श्री.मंगेश बावणे,देशी वायगांव हळद,देशी तूर, देशी काळी मिरची,मु.पो.आर्वी फरीदपूर ता.समुद्रपूर जि.वर्धा संपर्क..श्री.लांबट 9049767968
11) श्री.भरतसिंग राजपूत,देशी फाफडा मिरची,शेवगा,मु.वैंदाणे, ता.जी.नंदूरबार 7744012774
12) श्री.सुनिल डफळ, देशी झुडुपी चवळी,मु.धामारी ता.शिरूर जि.पुणे 9850220898
13) श्री.मेघनाथ घाडगे, देशी चवळी,मु.गुरसाळे,ता.माळशिरस जि.सोलापूर 9881149004
14) श्री.राजेंद्र मुळे, गावरानी तूर, मु.पो.मोघा ता.उदगीर जि.लातूर 9359277330
15) श्री.मधुकर पीसाळ, देशी झुडूपी चवळी, मु.होळ ता.बारामती,जिं.पुणे 9373589233
16) श्री.सचिन बाबर,काळा घेवडा,डाबरी घेवडा,वाघ्या घेवडा,हळद,धणे,ऊस,मु.किकली ता.वाई,जि.सातारा 7588382958.  9226503502
17) श्री.रुषीकेश घोरपडे 9130431618
      श्री.प्रसन्र घोरपडे 9604381813, 7620482788   दोघांकडे काळा घेवडा, पांढरा घेवडा,वाघ्या घेवडा,अद्रक, लसून,धणे,तांदुळजा, जवस, ऊस मु.पोगरवाडी, पो.करंडी, ता.जी.सातारा
18) श्री.विजय साळुंखे, काळा घेवडा, वाघ्या घेवडा, पांढरा घेवडा,धणे, अद्रक,ऊस, मु.पो.नागठाणे ता.जि.सातारा
9096143514     8808021579
19) श्री.श्रीकांत माने,काळा घेवडा, वाघ्या घेवडा,मु.पो.जकातवाडी ता.जि.सातारा 8149919703
20) सौ..मनीषाताई अरूणपंत जाधव, चवळी, शेवगा, मु.पो.लांबोटा, ता.निलंगा जि.लातूर 8380080091

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 10

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 10

मित्रांनो, ह्या लेखमालीकेला लहान शेतकर्‍यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार. ह्या माॅडेलमध्ये कोणकोणते बी किंवा रोपे एकरी किती पाहीजे ह्याची सारणी खाली देत आहे.
1) सुरू व करवंद— सुरु व दोन सुरुंचे मधोमध एक करवंद असे दोन्ही एक एकर माॅडेल क्षेत्राचे सीमेवर चारही बाजुंनी दर साडेचार फूट अंतरावर लावायचा आहे. ह्या सभोवतीच्या संपूर्ण सीमेची एकूण लांबी 924 फूट होते. म्हणजे आपल्याला सुरुची एकूण रोपे 206 + फूटतूट 14 = 220 व तेवढीच 220 करवंदाची रोपे हवी.
करवंद पावसाळा सुरु झाला की बाजारात फळे विकायला येतात. तीच संपूर्ण पक्व फळे खरेदी करा,त्यातून बी बाहेर काढून बीजामृतात बुडवून ताबडतोप किंवा शक्य तेवढ्या लवकर लावा. लावायला जेवढा उशिर कराल तेवढी बियांची उगवणशक्ती कमी होते.
सुरु व करवंदाची रोपे मिळण्यासाठी खालील संपर्क नंबरवर संपर्क करा—
1)सुरुसाठी...सत्यम सेल्स, काॅटन मार्केट, रेल्वे स्टेशनजवळ, नागपूर 9822640141
2)सुरुसाठी श्री,प्रशांत शिरोडे, मु.वाघेडा ता.समुद्रपूर जि.वर्धा 8888779554
3)करवंद साठी श्री.राजू घोडमारे मु.तेलगांव कामठी ता.कळमेश्वर, जि.नागपूर 9657403740
4)लाल व हिरव्या करवंद साठी श्री.संदीप गोमकाळे मु.लिंगापार्डी ता.काटोल जि.नागपूर 7020482215
5)32 एकरवर करवंदाचे कुंपन केलेले शेतकरी,श्री.समर्थ कारेगावकर मु.पो.कारेगांव ता.जि.परभणी 9922040407                       
6) सुरु व करवंदासाठी शासकीय रोपवाटीकेकडे चौकशी करा.

2) ऊस— ह्या माॅडेलमध्ये आपण करवंद सूरू व नारळ ह्या दोन्ही ओळींचे मधोमध दोन्हीपासून सहा फूट अंतरावर माॅडेलचे सभोवती चारही बाजुंनी ऊसाची एक ओळ दर सहा फुटावर घेणार आहोत.ह्या ऊस ओळीची एकूण लांबी 924 फूट आहे. म्हणजे 924 ÷ 6 = 154 उसाची एकूण बेटे मिळतात, एकूण 160 एक डोळ्याचे बेणे हवे, म्हणजेच बेण्यासाठी एकूण ऊस धाट  10 ते 12 ऊस हवे. पुढे ह्या 154 बेटातून उत्पादन म्हणून प्रति बेट 2 किलो सरासरी वजन पकडले तर 154 बेटे x 16 ऊस प्रति बेट = 2464 एकूण ऊस x 2 किलो वजन प्रति ऊस = 4928 म्हणजेच 5000 किलो. नैसर्गिक ऊसाचा 12 % ते 16 % साखर उतारा मिळतो. म्हणजेच एकूण गूळ निर्मिती 400 किलो होते. त्यातील 100 किलो गूळ जीवामृत घनजीवामृत ह्या माॅडेलसाठी बनविण्यासाठी व घरी खाण्यासाठी वापरून शिल्लकचा 300 किलो x 80 रू.प्रति किलो विक्री दर = 24000 रु. आपल्याला मजुरी,बी व रोपे खरेदीसाठी झालेला खर्च व पाणी वीज बील खर्च म्हणजेच एक एकर माॅडेलचा एकूण उत्पादन निघून जातो. किंवा एकुण 5000 किलो उसातून चवथा हिस्सा गुळासाठी राखून शिल्लक 3600 किलो उसापासून मधुमेहावर नियंत्रण करणारा विषमुक्त स्वादीष्ट औषधी गोड असा 10800 ग्लास प्रति किलो ऊस 600 मिली रस व प्रति ग्लास 200 मिली रस ह्या हिशेबाने 10800 ग्लास उसाचा रस मिळतो. प्रति ग्लास 20 रु.भावाने स्वताचे रसवंतीत विकून आपल्याला एकूण 2,16,000 दोन लाख सोळा हजार रुपये मिळतात. ह्यातून फळबागेचा व संपूर्ण घरखर्च निघून जातो. एकदा को.419 किंवा को. 86032 ऊस लावला की त्याचे सतत अनेक वर्ष आपण खोडवे घेणार आहोत. म्हणजेच आपला एक एकर माॅडेलचा दर वर्षीचा उत्पादन खर्च हा उसच भरून काढणार आहे. नैसर्गिक उसाचे बेणे ,घेवडा,अद्रक धणे बीयासाठी संपर्क करा...
1) श्री.प्रसन्न अर्जून घोरपडे ऊस 86032 काळा घेवडा,वाघ्या घेवडा,अद्रक लसून जवस,गूळ निर्मितीचा लहान कौटुंबीक  कारखाना ,मु.पोगरवाडी पो.करंडी ,ता.जि.सातारा 9604381813,  7620482788
2) श्री.रुषीकेश घोरपडे,ऊस,काळा व पांढरा घेवडा,अद्रक, धणे,तांदूळजा बी,मु.पोगरवाडी पो.करंडी ता.जि.सातारा 9130431618
3) श्री.विजय साळुंखे,ऊस,काळा घेवडा, वाघ्या घेवडा,पांढरा घेवडा,धणे, अद्रक मु.नागठाणे ता.जि.सातारा 9096143514,  8808021579
4) श्री.सचिन जगन्नाथ बाबर,ऊस,काळा घेवडा,डाबरी घेवडा,वाघ्या घेवडा,हळद, मु.किकली ता.वाई जि,सातारा 7588382958,  9226503501
5) श्री.दत्ता ईंदलकर ऊस व शेवगा बी,मु.चव्हाणवाडी पो.टेंभूर्णी,ता.माढा जि.सोलापूर 9766307755
6) श्री.विलास भरगुडे, ऊस,केळी,शेवगा,पपई,मु.पो,पळशी ता.खंडाळा जि.सातारा 9921580122
7) श्री.पांडुरंग पवार, ऊस,केळी,पपई, मु.पो.गार ता.माढा जि.सोलापूर 9623044419
8) श्री.महेशपाचपुते,ऊस,केळी,मु.पो.बोरीबेल ता,दौंड जि.पुणे 9881645556
9) श्री.सुरेशराव पानघाटे, ऊस, रसवंती,मु.पो.बोर्डा ता.वणी,जि.यवतमाळ 9834818364
10) श्री.कवडू देवाजी वडसकर,ऊस, हळद,मु.पो.मोहर्ली ता.वणी जि.यवतमाळ 8766903751
11) श्री.सुनील नारायणकर, ऊस, देशी केळी,काळा हरभरा,मु.आलमेल ता.सिंदगी जि.बीजापूर 9036061206
12) श्री.दत्तात्रय महीपती बावणे, ऊस, देशी मिरची,वर्षभर नैसर्गिक भाजीपाला उत्पादन, मु.केवड, ता.माढा जि.सोलापूर 9420649652
13) श्री.रामकृष्ण दरगुडे, ऊस,भुईमूंग,मु.लखमापूर ता.गंगापूर जि.औरंगाबाद, 9623327137
14) श्री.संतोष गदादे, ऊस, दाळींब,मु.पो.तांदळी, ता.शिरूर जि.पुणे 9960264511
15) श्री.तुकाराम भाऊसाहेब ईंगळे, ऊस, दाळींब,मु.कापूसवाडी,ता.पैठण, जि.औरंगाबाद 9822676442
16) श्री.विश्वास आप्पा उंन्द्रे, ऊस,आंबा,.,मु.पो,ता.वाशी जि.उस्मानाबाद 9130007402,  9049977402
17) श्री.सुमीत आर्वीकर,ऊस,आंबे,चिकू, दगडी ज्वारी, बंसी गहू, गुलाबी गावरानी हरभरा,देशपांडे गल्ली, लातूर
9975586585,   7588547740
18) श्री.अशोक धुमाळे,रसवंती व गुळासाठी उत्तम गोड ऊस,मु.पो,केळापूर ता.जि.वर्धा,9309523534
19) श्री.प्रशांत हाडके, ऊस,मु.पो.कामठी ता.जि.वर्धा,9763982816
20) श्री.सुमित वसू, ऊस,मु.पो,रोहणी,ता.देवळी जि.वर्धा  8308800946
21) श्री.प्रशांतशिरोडे,ऊस,मु.वाघेडा,ता.समुद्रपूर जिं वर्धा 8888779554
22) श्री.नलीन कुकडे, ऊस, मु.पो.सबकुंड ता.काटोल जि.नागपूर 9890095691
23) श्री.प्रदीप घाडगे श्री.हेमंत नाकले ऊस, मु.पो.वाघोडा ता.काटोल जि.नागपूर संपर्कासाठी..श्री.प्रमोद ठाकरे 9890252668
24) श्री.मुजफ्फर हुसेन, ऊस,नागपूर संपर्क..श्री.हेमंत चव्हाण 7588690688
25) श्री.सोमनाथ डोके, ऊस व लहान कौटुंबीक गुळ निर्मिती प्रकल्प मु.कनेरगाव ता.माढा जि.सोलापूर 9049932848,  7507706923
26) श्री.अनिल अरनाळे ऊस,मु.,पिंपळखुटे ता.माढा जि.सोलापूर 8888193984,  9834152385
      आपल्याला उसाची लागवड आॅक्टोबरमध्ये किंवा जानेवारीत करायची आहे. दोन उसाचे मधौमध मिरचीची लागवड आगष्ट मध्ये करायची आहे व ज्या चौफुलीवर पुढे ऊस लावणार आहोत त्या चौफुलीवर जुन मध्ये बाजरा  चवळी   मूंग  उडीद  तीळ  सूर्यफूल ह्यांचे मिसळून व बीजामृताचा संस्कार करून टोकायचे आहे.म्हणजे ऊस लावणीआधी एक पीक निघून हाती येते. नंतर सरी काढून व पाणी जीवामृतासह भिजवून ऊस लावायचा आहे.
देशी कापसाचे बी उपलब्ध आहे..संपर्क करावा
श्री.गजानन गारघाटे, मगन संग्रहालय समिती, गिरड, ता.समुद्रपूर, जि.वर्धा 9881576605
श्री.हेमंत चव्हाण नागपूर नॅचरल्स, लेंडा पार्क, नागपूर 7588690688
श्री.प्रविण साळुंखे,8805396639
पुढील मजकूर पुढील लेखांकात.     ...धन्यवाद

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 9

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 9

मित्रांनो, आता आपल्या जोखीममुक्त माॅडेलचे अंतिम प्रारुप तयार झालेले आहे. मशागत करून व शेवटच्या मशागतीआधी एकरी 400 किलो घनजीवामृत जमिनीत मिसळून दर तीन फूट अंतरावर आपण आडव्या उभ्या चौफुल्या पाडायच्या आहेत. नंतर प्रत्येक ओळीत पुढीलप्रमाणे रोपांची लावणी किंवा बियांची डोबणी म्हणजेच टोकणी मागील सर्व लेखांकांत सांगितल्याप्रमाणे करायची आहे. हा प्रत्येक ओळीतील फळझाडांचा क्रम पुढील प्रमाणे येईल.....
माॅडेलच्या सीमेवरील ओळ नंबर 1— माॅडेलचे चारही बाजुंनी सीमेवर दर साडेचार फुटावर सुरुची रोपे किंवा नाही मिळाली तर हादग्याचे बी लावा व दर दोन हादग्याचे मधोमध करवंदाचे बी किंवा रोप लावा.करवंदाचे बी साठी संपर्क करा..संदीप 7020482215 व बियांसाठी संपर्क श्री.वाजीब शेख जालना 9881430972
ओळ नं.2.---ओळ नं. एकचे खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं. दोन मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यावर एकाआड एक तूर अधिक चवळी अधिक अंबाडी अधिक तीळ अधिक बाजरी हे बीज मिश्रण व नंतर कापूस म्हणजे एक कापूस एक तूरमिश्रण नंतर पुन्हा कापूस ...तूर असा क्रम चालू द्या सीमेपर्यंत. देशी कापूस नाही मिळाला तर बी.टी.कापूस लावा. आपले तंत्र देशी व बी.टी.ला समान परिणाम देते. जर कापूस घ्यायचा नसेल तर फक्त तूरबीमिश्रण घ्या.
ओळ नं.3---ओळ नं.2 चे खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं.तीन मध्ये माॅडेलचे चारही बाजुंनी दर सहा फूटावर ऊस लावा व दोन ऊस बेण्यांचे मधोमध हळद अद्रक मिरची लावा.
ओळ नं.4---ओळ नं.तीनचे खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं.चार मध्ये पुन्हा दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यावर वर सांगितल्याप्रमाणे तूरबीज मिश्रण.. कापूस क्रम किंवा फक्त तूरबीजमिश्रण सीमेपर्यंत.
ओळ नं.5---ओळ नं.चारचे तीन फूट खाली येणार्‍या ओळ नं. पांच मध्ये...दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यावर एका रेषेत माॅडेलच्या सीमेपर्यंत पुढील क्रम चालू द्या.
1)नारळ, 2)हादगा, 3)शेवगा सुधारित पीकेएम किंवा ओडीसी किंवा वसंत जात, 4)हादगा, 5)लिंबू बी, 6)हादगा, 7) शेवगा, 8)हादगा,...ह्यापुढे पुन्हा तोच क्रम सीमेपर्यंत..नारळ..हादगा...शेवगा...हादगा..लिंबू...हादगा...शेवगा...हादगा..व पुन्हा नारळ व लावणीचा पुढील क्रम माॅडेलचे सीमेपर्यंत सुरु ठेवा.
ओळ नं.6--- ह्या ओळ नं.पांचचे तीन फूट खाली येणार्‍या ओळी नं. सहा मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यांवर  तूरबीमिश्रण ...कापूस किंवा केवळ तूर मिश्रण माॅडेलचे सीमेपर्यंत टोकावे.
ओळ नं.7--- ओळ नं. सहाचे तीन फूट खाली येणार्‍या ओळ नं. सात मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या एका आड एक चौफुलीवर केळीचे कंद व नंतर हादगा नंतर पुन्हा केळी नंतर हादगा असा माॅडेलचे सीमेपर्यंत केळी..हादगा असा एकाआड एक क्रम सुरु ठेवावा.
ओळ नं.8----ओळ नं.सातचे तीन फूट खाली येणार्‍या ओळ नं.आठ मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यावर तूरबीजमिश्रण ...कापूस..असा क्रम किंवा फक्त तूरबीजमिश्रण टोकावे.
ओळ नं.9---ओळ नं.आठचे तीन फूट खाली येणार्‍या ओळ नं.नऊमध्ये दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यांवर पुढील क्रम सुरु ठेवा..1)लिंबू, 2)हादगा, 3)सुधारित शेवगा, 4)हादगा, 5)गावरानी बहुवार्षिक शेवगा, 6)हादगा, 7)सुधारित शेवगा, 8)हादगा व नंतर पुन्हा तोच क्रम माॅडेलच्या सीमेपर्यंत...लिंबू...हादगा..सुधारित शेवगा...हादगा....गावरानी बहुवार्षिक शेवगा...हादगा...सुधारित शेवगा...हादगा व पुढे लिंबु व पुढील क्रम माॅडेलचे सीमेपर्यंत सुरु ठेवा.
ओळ नं.10---ओळ नं.नऊचे तीन फुट खाली येणार्‍या ओळ नं.दहा मध्ये दर फुटावर येणार्‍या चौफुल्यावर एकाआड एक तूरबीज मिश्रण नंतर कापुस असा क्रम किंवा फक्त तूरबीज मिश्रण टोका.
ओळ नं.11---ओळ नं.दहाचे तीन फूट खाली येणार्‍या ओळ नं.अकरामध्ये दर तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुल्यावर केळीचे कंद नंतर हादगा नंतर केळी नंतर  हादगा असा  अनुक्रमे  केळी ...हादगा ...केळी...हादगा...असा एका आड एक  क्रम माॅडेलचे सीमेपर्यंत असा लावणीचा क्रम सुरु ठेवा.
ओळ नं.12--- ओळ नं.अकराचे तीन फूट खाली येणार्‍या ओळ नं.बारा मध्ये दर तीन फूटावर येणार्‍या चौफुल्यावर एका आड एक तूरबीजमिश्रण नंतर कापूस नंतर तूरबीज मिश्रण पुन्हा कापूस असा क्रम किंवा फक्त तूरबीजमिश्रण टोका डोबा.
ह्या ओळ नं.12 नंतर पुन्हा एकदा एका खाली एक ओळ पुढील क्रम येईल..
ओळ नं.13 मध्ये नारळ व नंतर हादगा व ईतर फळझाडांची रोपे
ओळ नं.14 मध्ये तूर कापूस किंवा तूर
ओळ नं, 15 मध्ये केळी हादगा क्रम
ओळ नं. 16 मध्ये तूर कापूस किंवा तूर
ओळ नं. 17 मध्ये लिंबु...शेवगा असा क्रम
ओळ नं. 18 मध्ये तूर कापूस किंवा तूर
ओळ नं. 19 मध्ये केळी हादगा क्रम
ओळ नं.20 मध्ये तूर कापूस किंवा तूर
नंतर पुन्हा एका खाली एक तोच क्रम

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 8

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 8

मित्रांनो, आज आपल्या माॅडेलला आपण अंतिम प्रारुप देत आहोत. हे माॅडेल पुर्णपणे जोखीममुक्त राहणार आहे. साग लागवड जोखीममुक्त आहे कां ह्यावर मी विचार केला. तेव्हा दिसून आले की साग लावण्यातसुद्धा जोखीम आहे ती चोरांची. आपण पाहतो की चंदन व सागाला त्याचे वीस वर्ष वयानंतर सोन्याची किंमत येते व तस्कर चोर कोणताही आवाज न करणारे झाड कापण्याचे कटाई यंत्र आणून आपल्याला माहीत न होऊं देता गुपचुपपणे कापून नेतात व आपण काहीच करूं शकत नाही. कलेक्टरचे बंगल्यातून त्यांनी चंदन व साग कापून नेले तेथे आपली काय कथा ? तेव्हा ही जोखीम सूद्धा आपण घेणार नाही. ज्या ठिकाणी चार नारळांचे मधोमध आपण साग घेणार होतो तेथे सागाऐवजी दीर्घकाळ उत्पादन देणारा गावरानी शेवगा घेणार आहोत. ह्या माॅडेल क्षेत्राचे सीमेवर चारीबाजुंनी सीमेपासून बाहेरच्या बाजुने 12 फुटावर दोन फूट खोल व एक फूट खोल सरी पाडून घ्या. त्या सरीत जून जुलैमध्ये दर साडेचार फूट अंतरावर करवंद बी किंवा रोपे लावा. रोपे रोपवाटीकेत मिळतात. बी मी शोधतो आहे, तुम्हीही शोधा.ज्याला कोणाला बी मिळण्याचे ठिकाण मिळाले त्यांनी माझे 9850352745 ह्या मोबाईल नंबरवर मेसेज द्या. करवंदाचे माडेलचे सभोवती चारही बाजुंनी घनदाट भयंकर काटेरी कुंपण तयार होते, त्यातून कोणताही प्राणी घुसून आंत येऊं शकत नाही. करवंदाला खूप मागणी व भाव मिळतात. करवंदाची प्रक्रिया म्हणून लोणचे,चटणी,मुरब्बा घरी तयार करून आपल्या विक्री व्यवस्थेच्या माध्यमातून ते पदार्थ विकूं.त्याचवेळी दोन करवंदाचे मधोमध वाराप्रतिबंधक म्हणून सुरुचे बी किंवा रोप लावा. बी किवा रोपे सामाजिक वनीकरणाचे रोपवाटीकेत मिळतात. मीही शोध घेतो व तुम्हीही घ्या व मला कळवा.सुरुच्या फांद्या एकमेकांना भीडल्या की छान वाराप्रतिबंधक पट्टा तयार होतो. सुरुचे लाकडाला नाव बांधणीउद्योगात खूप मागणी असते.पुढे आॅक्टोंबर मध्ये करवंदापासून आतील नारळाचे बाजुने नारळाची ओळ व करवंदाची ओळ ह्या दोन्ही ओळींच्या मधोमध म्हणजे नारळ ओळीपासून सहा फुटावर व करवंदाचे ओळीपासून सहा फूट अंतरावर माॅडेलचे चारी बाजुंनी दोन फूट रुंद व एक फूट खोल नाली काढायची आहे व त्यां नालींत जीवामृत मिसळलेले पाणी सोडून द्यायचे आहे. नंतर त्यात दर सहा फुटावर को.419 किंवा को.86032 जातीच्या उसाचे एक डोळ्याचे बेणे बीजामृतात बुडवून लावायचे. ह्या एका डोळ्यांतून कमीतकमी बारा ते अठ्ठेचाळीस ऊस मिळतात. जीवामृत व घनजीवामृत बनविण्यासाठी लागणारा गूळ तसेच घरी खाण्यासाठी लागणारा गूळ निर्मितीसाठी व तसेच उसाचा औषधी रस पिण्यासाठी हा ऊस आपल्याला कामी येणार आहे. गूळ आपण आपल्या घरी बनवणार आहोत.  आपण येत्या आगष्टमध्ये जेव्हा हे माॅडेल उभे करणे ज्यांनी सुरु केले आहे त्यांचीच एक किंवा दोन दिवसांची कृती बैठक आपण घेणार आहोत त्या बैठकीत गूळ बनविण्याचे प्रात्यक्षिक आपणाला समोर गूळ तयार करून शिकविले जाणार आहे.नैसर्गिक  उसाचे बेणे आपणाला मिळून जाईल. त्याची काळजी नको. नारळाचे व लिंबुचे सावलीत स्ट्राॅ बेरी लावू. तसेच देशी कापूस मिळत नसेल तर बी.टी.लावा.
नैसर्गिक देशी केळी व जी नाईन किंवा बसराई केळीचे कंद,नैसर्गिक उसाचे बेणे व गावरानी शेवगा मिळण्याचे पत्ते व त्यांचे मोबाईल नंबर पुढील प्रमाणे....
1) श्री.महेंन्द्र बुवासाहेब बागल सुंदर नैसर्गिक केळीचा माॅडेल प्लाॅट प्रत्येक घड 50 ते 80 किलोचा. मु.मांडवखडक पो,निरगुडी ता.फलटण जि.सातारा 9765051885,  9404506686,   7350765579
2) श्री.गंगाधर गाढवे व गणेश सातव, सुंदर केळी पण परवा भयंकर वादळाने नुकसान, म्हणून कंद उपलब्ध.
मु.पो.भीमाटाकळी ता.शिरुर जि.पुणे 9673199033,  9604528858,   8888093311
3)श्री.नवनाथ दत्तु फडतरे, देशी केळी,86032 ऊस बेणे व गावरानी अद्रक , मु.पो.बेलवाडी ता.कराड जिं.सातारा 9511742454,  9823723329   
4) डाॅ.शशीकांत साळुंखे, केळी ऊस अद्रक घेवडा, मु.पो.मालगाव ता.जि.सातारा 9226221759
5) श्री.संतोष रेवटे ,देशी केळी, ऊस व पानमळा, मु.पो,आर्वी ता,कोरेगांव जि.सातारा 9021350237
6)श्री.अरुण माने, देशी लाल ऊस,मु.पो,रहीमतपूर ता.कोरेगाव जि.सातारा 9860298578
7)श्री.प्रकाश नानासाहेब जगदाळे, देशी केळी व सुधारित केळी, ऊस, मु.पो.सराटी ता.ईंदापूर जि.पुणे 9657496111
8)श्री.शिवाजी मालुसरे, नैसर्गिक स्ट्राॅबेरी रोपे, मु.पो.कासवंद ता,महाबळेश्वर जि.सातारा 9764201137
9)श्री.विक्रम कदम, नैसर्गिक स्ट्राॅबेरी, सीमला मिरची,मु.पो.मालगांव ता.जि.सातारा 9766550591, 
10)श्री.गणेश धोंडीबा भिलारे,नैसर्गिक स्ट्राॅबेरी,मु.पो,भिलार ता.महाबळेश्वर जि.सातारा 9921917428
11)श्री.अंकुश धाबेकर, सुंदर नैसर्गिक केळी,40 ते 50 किलोचे घड पण परवा भयंकर वादळाने नुकसान,बेणे उपलब्ध. मु.पो.नांदा, ता.कोरपना जि,चंद्रपूर 9067526572
12)श्री.विक्रम ठाकूर, शेवगा, मु.पो,पंचाळा ता,रामटेक जि.नागपूर 7620743079
13)श्री.कैलास चौधरी. केळी,मु.पो.फत्तेपूर ता,जामनेर जि,जळगाव 9021703946,  7030682629 भाऊ सुहास
14)श्री.प्रफुल्ल पटेल केळी,मु.पो,हंतोडा ता.अंजनगाव सुर्जी जि,अमरावती.9421739564
15)श्री.दिनेश सबराह, केळी,भाजीपाला,मु.पो,वायफळ ता.जि.वर्धा 8421639699
16)श्री.निरंजन स्वामी,केळी,ऊस,भाजीपाला,मु.पो.दावतपूर ता.औसा जि.लातूर 9420326204
17)श्री.सचिन कुळकर्णी,श्रीराम काळे केळी,शेवगा,मु.पो,भावीनीमगाव ता.शेवगाव जि.नगर 9850181983, 9921099352
18)श्री.विनोद बोरसे केळी,मु.पो,पिचरडे ता..भडगाव जि.जळगाव 9272159264
19)श्री.आर.एन.महाजन, केळी,मु.पो,वाडे ता,भडगाव जि.जळगाव 9422275264
20)श्री.संजय किरमिरे केळी,मु.पोता, ता.जि.गडचिरोली 8408024194
21)श्री.शामसुंदर भुतडा,केळी,संत्रा,मु.पो.पानवाडी,ता,आर्वी जि.वर्धा 9604627411
22)श्री.गजानन मानकर, केळी, देशी पपई व वर्षभर भाजीपाला,मु.दापोली,ता.देवळी,जि.वर्धा 8390087224
23)श्री.विजय भदूजी राठोड,केळी,शेवगा मु.मनुसधरी,ता.घाटंजी जि.यवतमाळ 9421475313
24)श्री.ज्ञानेश्वर नारायण महाजन, सुंदर नैसर्गिक लींबू,स्वदेशी कापूस.मु.उतराण,ता.एरंडोल, जि.जळगाव 9096590513
25)श्री.नाना महाजन, सुंदर नैसर्गिक लिंबू,मु.पो.नगरदेवळा, ता.पाचोरा,जि.जळगाव 9970709999
   धन्यवाद. पुढील पत्ते पुढील लेखांकात

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 7

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 7

मित्रांनो, ज्यांचेकडे आवश्यक पाणी व कष्ट करण्याची क्षमता आहे, त्यांनी हे माॅडेल उभे करण्याचा निर्णय घ्यावा. ह्यात दिलेले सर्व तंत्र आपल्या चळवळीच्या हिम्मतबाज मित्रांचे शेतावर आम्ही सिद्ध केलेले आहे , व मागील लेखात मी त्यांचे फोन नंबरसुद्धा दिलेले आहे. काहींनी विचारले की माझे शेतावर हे माॅडेल कां घेतले नाही ? कारण माझी शेती कोरडवाहू आहे. पाण्याशिवाय हे माॅडेल आपण घेऊं शकत नाही. हे माॅडेल कोरडवाहू शेतीत घेता येईल काय, ह्यावर मी पुढील वर्षी काम चालूं करणार आहे. काही मित्रांनी ह्या माॅडेलवर आक्षेप घेतला की मी हे माॅडेल तरूण शेतकर्‍यांना देऊन त्यांना घोर संकटात टाकतो आह व त्यांचे भविष्य बरबाद करतो आहे. ते आक्षेप घेणारे माझेच जुने सहकारी आहेत,ज्यांचेवर मी मुलासारखे प्रेम केले आहे व आजही करतो आहे. मित्रांनो, ह्या माॅडेलमध्ये कोणतीही जोखीम नाही. नारळ सर्व महाराष्ट्रात विदर्भातसुद्धा उत्तम फळ देत आहे. आपल्या चळवळीचे एक सेनापती श्री.शरद शिंदे मु.मोडनिंब ता.माढा जि.सोलापूर 9028598955  ह्यांचे कडे उंच बाणावली नारळाची दहा बारा वर्षाआधी लावलेली रोपे आता जीवामृतावर दरवर्षी प्रति झाड 150 ते 200 नारळ फळांचे उत्पादन देतात असे त्यांनी मला सांगितले. पांचव्या सहाव्या वर्षापासून नारळाचे व्यापारी उत्पादन सुरूं होते,एका नैसर्गिक नारळ फळाची बाजारातील कमीत कमी किंमत 20 रूपये आहे. म्हणजे एक नारळाचे झाड दर वर्षी कमीतकमी 3000 रुपये उत्पन्न देते. आपण घरीच नारळापासून व्हर्जीन तेल , खाण्याचे तेल व नारळापासून नारळ दूध, बर्फी व ईतर पदार्थ तयार करणार आहोत. श्री,शरद शिंदे नारळचे तेल स्वताः घाण्यावर काढतात. कोकणात तर नैसर्गिक नारळ आपल्या उत्पादकांना कल्पवृक्षच ठरला आहे. आपल्या माॅडेलमध्ये नारळाचे एकरी 75 झाडे बसतात. म्हणजे एकरी दीड लाख ते सव्वा दोन लाख रुपये वर्षाला मिळणार आहे. बरं, नारळ उंच गेल्यामुळे त्याच्या खोडाएवढीच जागा त्याने घेतली. नारळ झाडाखालील संपूर्ण जागा त्यांने आपल्याला आंतरपिकासाठी उपलब्ध करून दिली. ह्या खाली जागेत आपण द्राक्षवेली व स्ट्राॅबेरी आच्छादनावर पसरविणार आहोत. मागील वर्षी जमिनीवर व आच्छादनावरील विराजमान झालेले नैसर्गिक द्राक्षाचे सुंदर घड शिवार फेरीत माझ्यासोबत आलेल्या 650 द्राक्ष उत्पादकांनी बघितलेत व ह्यावर्षी सुद्धा आपण पुढील फेब्रुवारीत होणार्‍या शिवार फेरीत बघणार आहोत. नारळावर काळी मिरी पांच वर्षानंतर लावणार आहोत. काळी मिरीची सख्खी बहीण औषधी पानपिंप्री विदर्भातील अति उष्णतामानाच्या अमरावती व अकोला जिल्ह्यात जीवामृतावर सुंदर उत्पादन देत आहे.काळी मिरीला पर्याय म्हणून आपण पानपिंप्री घेणार आहोत.सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने पानपिंप्रीचे उत्पादन घेणारे आमचे नैसर्गिक शेतकरी आहेत श्री.सागर नेमाडे अंजनगांव सुर्जी 9922897747, श्री.रुषीकेश गुजर व हेमंत बोडखे अकोट 9867992162, .हे नैसर्गिक पानपिंप्रीचे माॅडेल बघायला माझेसोबत शिवारफेरीत चारशे शेतकरी होते. आता मला सांगा ह्या माॅडेलमध्ये नारळ घेण्यात कोणती जोखीम आहे ?
     नैसर्गिक लिंबु जर बाराही महिणे सतत भरपुर उत्पादन देत असेल तर त्यात कोणती जोखीम आहे ? नारळ उंच गेल्यावर नारळाच्या फांद्यांची लिंबू झाडाला कोणतीही अडचण नाही. लिंबू झाडांच्या खालील फांद्या काढून टाकून लींबुच्या सर्वात खालच्या फांद्या  जमिनीपासून सहा फुटावर वाढतील ह्या हिशेबाने आकार देणार आहोत, म्हणजे फळे वेचायला व तोडायला कोणतीही अडचन येणार नाही. लिंबुच्या खालील सावलीत आच्छादनावर पानवेल पसरविणार आहो. ह्यावर्षी शिवारफेरीत आपण फळझाडाखाली पसरलेली व जावामृृतावर सुंदर उत्पादन देणारी पानवेल पाहणार आहोत. लिंबू फळापासून घरीच लिंबू चटणी व लोणचे तयार करुन आपल्या विक्री व्यवस्थेमार्फत ग्राहकांना विकून जास्त उत्पन्न मिळवणार आहोत. आता मला सांगा ह्यात कोणती जोखीम आहे ?
    आपण ह्या माॅडेलमध्ये नैसर्गिक शेवगा घेणार आहोत. शेवगा बाराही महिणे जीवामृतावर भरपुर उत्पादन व पैसा देतो. शेवग्याच्या शेंगा व ओली वाळली पाने ते पोषणमुल्यांनी व औषधी मुल्यांनी समृद्ध असल्यामुळे देशात विदेशात भरपूर मागणी व भाव आहेत. आता आठ दिवसाआधी केंद्रिय मंत्री श्री.नीतीन गडकरीसोबत झालेल्या भेटीत ते मला म्हणाले की सुभाष भाऊ आम्हाला नैसर्गिक शेवगा पाने शेकडो कंटेनर निर्यातीसाठी द्या , आम्ही पाहीजे तो भाव देऊ. पाणी शुद्धीकरणासाठी आता ब्लीचींग पावडरचे ऐवजी शेवग्याचे बियांची पावडर उत्तम आहे हे दिसून आल्यामुळे व ब्लीचींग पावडरचे अवशेष पिण्याचे पाण्यात येतात हे दिसून आल्यामुळे निकट भविष्यात शेवग्याचे बियांना प्रचंड मागणी येणार आहे, त्यासाठी आपण आतापासूनच तयार राहायला हवे. तसेच साग व शिसम आपल्या मुले नातवंडाची भविष्यकालीन बॅन्क ठरणार आहे. सागाचे खालील जागेचा उपयोग आपण द्राक्ष किंवा काळी मिरी घेण्यासाठी करणार आहोत. आता मला सांगा शेवगा व साग घेण्यात कोणती जोखीम आहे ?
    हादगाचे बी मागवून जुन जुलैमध्ये लाऊन द्या. पुढे आॅक्टोंबर मध्ये हादग्यापासून किंवा पांगार्‍यापासून एक फूट अंतरावर आपण बियांचे द्राक्षाचे छाटकलम लावणार आहोत व पुढे ती वेल हादग्यावर चढवणार आहोत व दोन वर्षांनी द्राक्षाच्या हादगा म्हणजेच हेटा झाडाचे आधाराने उभ्या असलेल्या द्राक्ष वेली आपल्या खोडावर भरपूर घड देणार आहेत. ह्यावर्षी द्राक्ष वेलीच्या खोडावर भरपुर लागलेले घड आपण माझ्यासोबत येणार्‍या जानेवारी फेब्रुवारी 2020 मध्ये शिवार फेरीत बघणार आहात. मग आपणाला कळेल की खरोखरच ह्यात कोणतीही जोखीम नाही.
    मी मागील लेखात म्हटले होते की दाळींब फळांना पाखरं खुप त्रास देतात व नुकसान होते. सीताफळ नाशिवंत फळ असल्यामुळे ताबडतोप विक्री व्यवस्था झाली नाही तर व प्रक्रिया खर्चिक आहे,त्यामुळे आपण ह्या माॅडेलमध्ये सीताफळ व दाळींबाचे जागी केळी घेणार आहोत. केळीची फळे पिकल्याशिवाय फळांना पाखरे व जनावरे खात नाहीत. आपण केळीचे घड झाडावर पिकू देत नाही, पक्वतापूर्व काळात हिरवीच फळे काढणार असल्यामुळे कोणतीही जोखीम नाही. नैसर्गिक केळीचे पीक रोग किडीला बळी पडत नाही व तीव्र उन्हाचा आपल्या केळीला तेवढा त्रास होत नाही. एकदा केळी लावली की सतत अनेक वर्ष आपण आपल्या पद्धतीत खोडवे घेऊ शकतो व एकाच खोडापासून सारख्याच वजनाचे दोन तीन घड घेत आहोत. सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीत केळीचा सहावा खोडवा श्री.बुवासाहेब बागल व त्यांचा मुलगा महेंद्र बुवासाहेब बागल मु,मांडवखडक पो,निरगुडी ता,फलटण जीं.सातारा 9765051885,  9404506686,   7350765579 ह्यांचे फळबागेत उभा आहे, जाऊन खात्री करून घ्यावी. केळीवर प्रक्रिया उद्योग मी तुम्हाला दाखविणार आहे.
केळीचे नैसर्गिक पीक घेणारे आमचे शेतकरी, त्यांचेकडे केळीचे कंद उपलब्ध होऊं शकतात, त्यांचे पत्ते व फोन नंबर उद्याचे लेखांक नं.8 मध्ये देणार आहे.
धन्यवाद.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 6

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 6

मित्रांनो, उन्हाळ्यात खड्डे करून व ते खड्डे शेजारी ढीग लावलेल्या नर्सरी मातीने भरुन त्या खड्यावरील मध्यभागी फळझाड रोप लावायची खुण म्हणून पावसाला सुरुवात होताच दोन बिया बाजरी अधिक दोन बिया ज्वारी अधिक दोन बिया नाचणी म्हणजे रागी दोन बिया वरी म्हणजे भगर अधिक दोन बिया मूंग अधिक  चवळी मिसळून व बीजामृताचा संस्कार करून हे बीजमिश्रण टोका डोबा. पुढे आगष्टचे दुसर्‍या पंधरवाड्यात ते बाजरा चवळी व मूंगासकट उपटुन त्या ठिकाणी फळझाडाचे रोप लावायचे आहे. बाजरा ,मुंग व चवळीचे तुकडे करुन त्याचे रोपाभोवती आच्छादन करायचे आहे.म्हणजे बाहेरुन आच्छादनासाठी काष्टअवशेष आणण्याची आवश्यकता पडत नाही.
   ह्या माॅडेल फळझाडांच्या दर सहा फुटावर येणार्‍या दोळ ओळींचे मधल्या पट्ट्यात  शेवगा, हादगा, ह्यांचे बी व त्या सोबतच ज्या चौफुलीवर तूर घ्यायची आहे  त्या आखून दिलेल्या  चौफुल्यांवर पुढील  तूरअंबाडीसूर्यफूलतीळचवळीबाजराज्वारीनाचणीभगर ह्यांचे मिश्रण केलेले एकत्रित बीजमिश्रण ज्या ज्या एका आड एक चौफुल्यांवर लावायचे आहे व एका आड एक कापूस लावायचा आहे  त्या त्या चौफुल्यांवर पावसाळा सुरु होताच बीजामृताचा संस्कार करून ते बी मिश्रण एका आड एका चौफुलावर टोका म्हणजेच डोबा व त्यानंतरच्या एकाआड एक रिकाम्या चौफुल्यांवर देशी कापूस बी बीजामृताचा संस्कार करून लावा. म्हणजे ह्या चौफुल्यांवर एक तूर पुढे एक कापूस पुन्हा तूर व कापूस असा क्रम येईल..ह्या आंतरपिकांपासून आपल्याला घरी जेवनात बाजरीची किंवा ज्वारीची नाचणीची भगरीची भाकर ईडली दोसा, तुरीचे वरण,अंबाडीची हिरवी किंवा सुकवलेली पाने व चवळी शेंगांची  भाजी,अंबाडी,सूर्यफूल व तीळाचे तेल मिळेल.तसेच आपल्याला खादी कापडासाठी व शिल्लकचा कापूस विकून दिवाळीला पेसे मिळण्यासाठी घरचाच कापूस मिळेल. वर्धेला मगन संग्राहलयात कापूस देऊन कापड मिळण्याची व्यवस्था आहे. देशी कापूस बियासाठी संपर्क करा..श्री.सचिन झाडे,कमलनयन बजाज फौंडेशन वर्धा 8805009737, श्री.गजानन गारघाटे  मगन संग्रहालय समिती,वर्धा 9881576605,  9834497887. ह्या दोन्ही संस्था सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जन चळवळीतील प्रमुख संस्था आहेत व त्या दोन्ही संस्थात दोन हजार शेतकरी सुभाष पाळेकर कृषी करतात.त्यांचेकडे देशी ज्वारी तूर अंबाडी तीळ जवस व गावरानी भाजीपाला ह्यांचे बी सूद्धा शिल्लक असेल तर उपलब्ध होईल.
    त्याचवेळी फळझाड रोपांच्या ओळीत व त्याखालील तुरीच्या ओळीत प्रत्येक दोन चौफुल्यांचे मध्ये असणार्‍या रिकाम्या जागेचा कौटुंबिक सदुपयोग करण्यासाठी त्या रिकाम्या जागेत खरीप कांदा मेथी धणे पालक अद्रक हळद ह्यांचे बी किंवा बेणे लावा. ह्यापासून वरण व भाजीचे फोडणीचे साहित्य मिळून जाईल. पुढे हे खरीप आंतरपीक निघाल्यावर रबीत त्याच जागी हरभरा, देशी लसून,जीरे,धणे,मेथी,पालक,गाजर,मुळा,वाल,बीट, मोहरी,रबी कांदा, जवस करडी सूर्यफुल ईत्यादि आंतरपिकांचे बी बीजामृताचा संस्कार करून टोका डोबा किंवा रोप लावा. ह्यापासून जेवनासाठी लागणारे तेल ,कोशिंबीर व फोडणीचे साहित्य मिळून जाते. आता आंतरपिकांचे हे जंगल पाहून माझे शिबीर ऐकले नसेल तर तुमचे मनांत शंका येईल की ही सर्व संमिश्रित रोपे व झाडे एकमेकाशी अन्नद्रव्ये घेण्याची आपसात स्पर्धा करतील. आपण ही भीती मनातून ताबडतोप काढून टाका. कृषी विद्यापीठे खोटे बोलतात की दोन झाडात स्पर्धा असते. सत्य हे आहे की कोणत्याही दोन झाडात अन्न द्रव्यांची स्पर्धा बिलकूल नसते. झाडांचे 98.5 % शरीर फक्त हवा पाणी व सूर्यप्रकाशापासून बनते ,जे आपण देत नाही. मग स्पर्धेचा प्रश्न कुठे येतो ? फक्त स्पर्धा ओलावा व सूर्यप्रकाश घेण्यात असते. ती टाळण्यासाठी वेळोवेळी निंदण खुरपण केलेच पाहीजे. हे माॅडेल कष्टकरी लहान शेतकर्‍यांसाठी आहे, स्वता कष्ट न करता फक्त मजूर लावून शेतीकाम करून घेणार्‍या शहरी शेतीशौकीन लोकांसाठी नाही. त्यांनी ह्या भानगडीत कृपया पडूं नये. एक रुपयात गहू व दोन रुपयात तांदूळ मिळणार्‍या ह्या जमान्यात मजूर मिळेलच ह्याची बिलकूल हमी नाही.
     सीताफळाचे बी फळातून बाहेर काढल्यावर तीन महिण्यापावेतो सुप्तावस्थेत असते व नंतर सुप्तावस्था तोडून तीन वर्षापर्यंत त्याची उगवणक्षमता राहते.एका पूर्ण पक्व सीताफळ फळात 36 ते 48 बिया मिळतात. सीताफळाच्या बिया पावसाळा सूरु होताच आवश्यक ओलावा उपलब्ध होताच बीजामृताचा संस्कार करून ज्या चौफुलीवर सीताफळ झाड उभे करायचे आहे त्या चौफुलीवर टोका म्हणजेच डोबा. नंतर त्यावर चांगल्या माळ्याचे हातून बालानगर किंवा अॅनोना हनुमानफळाची कलम करून घ्या. जर कलम केलेले आयते रोप लावायचे असेल तर आगष्टचे दुसर्‍या पंधरवाड्यात आश्लेषा नक्षत्रात खड्यात रोप लावणी मागील लेखांकात सांगितल्यानुसार करा. कलम केलेले जीवामृतावरील हनुमानफळाचे रोप पाहीजे असेल तर श्री.सुरेश पाटील ,सरस्वती नर्सरी,मु.पो.हळदगांव ता.समुद्रपूर जि.वर्धा 9960519004 ह्यांना संपर्क करा. सीताफळाचा गर वेगळे करण्याचे यंत्र आहे व त्या गरावर प्रक्रिया करून साठवून विकण्याचे तंत्रज्ञान सुद्धा सीताफळ उत्पादक संघाकडे उपलब्ध आहे. सीताफळ दाळींब  ह्यांवर बारमाही पाणी उपलब्ध असेल तर वर्षभर सदाबहार फळे घेता येतात. परंतु पाण्याची टंचाई असेल तर मात्र फक्त पावसाळ्यावर जगवणारा मृग बहारच घ्यावा. पावसावर झाडे जगतात. पुढे दोन तीन पाण्यात हमखास फळे घेता येतात. फळकाढणी झाल्यावर पुढे झाडांची पाने गळून पडतील व झाडे सुकल्यासारखी दिसतील. रासायनिक शेतीत ती पूर्ण सुकतील. परंतु सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी तंत्रात पानगळ होऊन सुकल्यासारखी दिसतील पण सुकलेली नसतील, आंतून धुगधुगी कायम असेल.झाडे चक्क समाधीत गेलेली असतील. पुढील पावसाळा सुरुवात होताच समाधी भंग करून झाडांना पुन्हा नवीन पालवी फुटून येते व बहार येतो. फक्त पावसाळ्यात जमिनीला भरपूर जीवामृत पाजा. अशा पद्धतीने मृग बहाराची दाळींब फळबाग सातारा जिल्यातील सदा दुष्काळी माण  तालुक्यातील बीदाल गावचे सुभाष पाळेकर शेती पद्धतीने दाळींब घेणारे दाळींब उत्पादक श्री.दीपक बोराटे 9423863440 हे घेतात.त्यांचेशी चर्चा करावी......पुढील लेखांकाची वाट बघा. मी ह्यावेळी हिमाचल प्रदेशात असून पालनपूर कृषी विद्यापीठात सरकारने आयोजित केलेले माझे राज्यस्तरीय सहा दिवसांचे शिबीर प्रचंड गर्दीत सुरु आहे. त्यामुळे वेळ कमी मिळतो आहे. धन्यवाद

पंचस्तरीय फळबागजंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 5

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 5

मित्रांनो,
रोपांची लावणी किंवा बी टोकणी(डोबणी)
लेखांक तीन मध्ये सांगितल्यानुसार आपण मशागत करून व शेवटच्या मशागतीआधी एकरी 400 किलो घनजीवामृत विस्कटून कुळवणीने(वखरणीने)मातीत मिसळून दिले असेल.नंतर मान्सून पूर्व पाऊस आल्यावर जमिनीतील तणांचे बियांना उगवून वर येवू द्या व रान बारक्या तणांनी हिरवे झाले की कुळवणीची पाळी पुन्हा एकदा देऊन तणांचा नायनाट करा.मान्सूनला सुरुवात झाली व पेरणीयोग्य पाऊस झाला की दर तीन फूट अंतरावर आडवे उभे सारे म्हणजे रेघा फाडून औरस चौरस चौफुल्या पाडून घ्या.एकरी एकूण 4840 किंवा दहा गुंठा शेतात एकूण 1210 चौफुल्या बसतात.
खड्डे खोदणे व भरणे—नंतर जेथे नारळ,लिंबू,साग,केळी,सीताफळ,दाळींब व हादगा किंवा पांगारा लावायचा आहे त्या दर सहा फूट अंतरावर येणार्‍या ओळीत प्रत्येक चौफुलीवर दीड फूट लांब दीड फूट रुंद व दीड फूट खोल ह्या आकाराचे खड्डे खोदून घ्या व त्यांना उन्हात चांगले वाळूं द्या. खड्यातील माती खड्याजवळच पण खड्यात माती परत येऊन पडणार नाही एवढ्या सुरक्षित अंतरावर टाकून तिचा ढीग लावा. जर जमीन खोल काळी चिक्कन पाणी धरून ठेवणारी असेल तर प्रति ढीग दोन ओंजळ कच्चा मुरुम किंवा दोन ओंजळ वाळू त्या ढीगावर टाका. परंतु जर जमीन हलकी मुरमाड दगडी असेल तर प्रति ढीग एक ओंजळ तलावातील किंवा शेततळ्यातील गाळ त्या ढीगावर टाकावा. नंतर प्रति ढीग दोन ओंजळ घनजीवामृत त्या ढीगावर टाका. तसेच शक्य असेल तर प्रति ढीग  एक ते दोनं ओंजळ वाळलेल्या पालापाचोळ्याचा चुरा किंवा त्याऐवजी  सोयाबीन किंवा हरभरा किंवा तूर किंवा मूंग उडीद ह्या कडधान्य पिकाचे कुटार बारीक करून त्या ढीगावर टाका. सोबतच प्रति ढीग 500 मिली जीवामृत त्या ढिगावर टाका. नंतर पावड्याने हे मातीचे संमिश्रण आडवे उभे तोडून चांगले मिसळून घ्या व तो ढीग कमीतकमी अठ्ठेचाळीस तास आंबवणीसाठी ठेवा. दोन दिवसानंतर ही अतिशय सुंदर जीवाणूसमृद्ध जिवंत नर्सरी माती तयार होईल.
रोपांची किंवा कलमांची लावणी व बी टोकणी ( डोबणी)
कोणत्याही फळझाडांची रोप किंवा कलम लावणी किंवा मिरची रोप लावणी भर पावसाच्या जून जुलै मध्ये लावूं नये, तर आश्लेषा नक्षत्रात म्हणजेच ठोकळ मानाने आगष्ट महिण्याचे दुसर्‍या पंधरवाड्यात करावी. तोपर्यंत मोठ्या पावसाचा भर ओसरलेला असतो व जमिनीत अनंत कोटी जीवाणूंच्या सर्वोत्तम हालचाली सुरु झालेल्या असतील, तसेच रोपांच्या मुळ्यांना नवीन मातीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण व वाफसा मुळ्यांचे सान्नीध्यात निर्माण झालेले असेल. मात्र काळी मिरी किंवा औषधी पान पिंपरीची लागवड सूर्याच्या पावसाळी दक्षीणायनण भ्रमण काळात न करता सूर्याचे उत्तरायण भ्रमण काळाचे प्रथम सत्रात म्हणजेच मकर संक्रांत 14 जानेवारी ते फेब्रुवारीत येणार्‍या रथसप्तमी ह्यांचे दरम्यानचे काळात करावी.त्या काळात काळी मिरी किंवा पान पिंपरीची फळकाढणी संपलेली असते व आपल्याला लावणीसाठी छाटकलम सहज उपलब्ध होतात.
      नारळ, दाळींब,साग,ह्यांची रोपे व केळीचे कंद ह्यांची लावणी करतांना प्लॅस्टीक पिशवी फाडून बाजूला करावी.नंतर कलम किंवा रोप डाव्या हातात पकडून ते खड्यात अशा तर्हेने धरावे जेणेकरुन रोपांच्या मुळ्या खड्याचे मधोमध लटकत राहतील. नंतर उजव्या हाताने मग्ग्यात बीजामृत घेऊन ते बीजामृत रोपांच्या मुळ्यांवर शिंपडावे. नंतर मग्गा खाली ठेऊन उजव्या हाताने ढीगातील नर्सरी माती खड्यात मुळ्यांच्या सभोवती टाकावी व खड्डा भरून घ्यावा. नंतर दोन्ही हातांनी खड्डा चांगला दाबून घ्यावा. माती भरतांना खोडाजवळ जमिनीच्या पातळीपेक्षा चार बोटे म्हणजे तीन इंच उंचवटा येईल व बाहेरचे बाजुला उतार निघेल अशा रितीने भरावा, जेणेकरुन पडणारे पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी रोपाच्या खोडाजवळ थांबून खोड व मुळ्या सडणार नाहीत व रोपे मरणार नाही, मुळ्यांजवळ सुंदर वाफसा निर्माण होऊन रोपे जोमदारपणे वाढायला लागतील. नंतर त्या रोपासभोवतीच्या मातीवर झारीने जीवामृत शिंपडा व भरलेली माती साडेचार इंच म्हणजे सहा बोटे जाडीच्या काष्ट आच्छादनाने झाकून टाका.
 आच्छादन कां झाकावे ?
रोपलावनीनंतर मुळ्यांना ह्या नविन सावत्र माती आईशी जुळवून घेण्यासाठी व माती आणि मुळ्या ह्यांच्यात अन्नद्रव्यांचे आदाणप्रदाण सहजीवन सुरु होण्यासाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण हे आच्छादनाने लवकर निर्माण होते. पावसाचे प्रति सेकंद तीस फूट वेगाने येऊन मातीवर आदळणारे  पावसाचे थेंब मातीत खड्डे पाडतात. परिणामी रोपांच्या मुळ्या उघड्या पडतात व सुपीक नर्सरी माती पावसाने वाहून जाते व रोपांची वाढ खुरटते. आच्छादनाने पावसाचे थेंब जमिनीला स्पर्ष करीत नाही, परिणामी मुळ्या उघड्या पडत नाहीत व माती वाहून न जाता सुरक्षित राहते. आच्छादन मुळ्यांचे व मातीतील अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्म जीवाणुंचे वादळी वारा, प्रखर उन्ह,उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा, पाऊस, गारपीट, कीटक, पक्षी ह्या बाह्य शत्रुंपासून संरक्षण करते. वेगाने येणारे पावसाचे थेंब आच्छादन नसेल तर मातीवर वेगाने आदळून जेव्हा वर उसळतात तेव्हा त्या थेंबात थेंबांसोबत वर उसळलेले मातीचे कण विरघळतात व मातीसहित ते थेंबाचे पाणी रोपांच्या खालील पानांवर पडतात तेव्हा तो मातीचा गाळ पानावर जमा होतो. परिणामी पाने सडतात व त्यांची प्रकाशसंश्लेषणाने होणारी अन्न निर्मिती थांबते व शेवटी पाने सुकून गळून पडतात. आच्छादनाने थेंबांचा संबंध मातीशी न आल्यामुळे हे होणारे संभाव्य नुकसान टळते. मातीतील तणांच्या बिया उगवून वर आल्यावर त्यांच्या अंकुरांच्या वाढीसाठी सूर्य प्रकाशाची आवश्यकता असते. सूर्य प्रकाश उपलब्ध झाला नाही तर अंकूर पिवळे पडतात व शेवटी सुकून मरतात. रोपाजवळील तणे उगवून आल्यानंतर लावणी केलेल्या फळझाडांच्या रोपांशी ओलावा व सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात.परिणामी तणे वेगाने वाढून नवजात रोपांना झाकून टाकतात. त्यामुळे रोपांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे रोपांची वाढ खुंटते, रोपे कमजोर बनतात व शेवटी कीडी रोगांना बळी पडतात. आच्छादनाने ह्या तणांच्या अंकुरांना सूर्य प्रकाश मिळत नाही, परिणामी त्यांची वाढ खुंटून तणे पिवळी पडतात व शेवटी आच्छादनाखालीच सुकून मरतात व तणांचे नैसर्गिक नियंत्रण आपोआप होते. आच्छादन एक अदभूत नैसर्गिक तणनाशक आहे. आच्छादन व जीवामृत ह्यांच्या संयुक्त कुजण्याचे क्रीयेतून जमिनीला सुपीक व उत्पादक बनविणार्‍या ह्युमसची म्हणजे जीवनद्रव्याची निर्मिती होते.ह्या ह्युमसमधूनच रोपांच्या मुळ्यांना रोपांच्या  वाढीसाठी लागणारी सर्व अन्नद्रव्ये,सेंद्रिय आम्ले,ह्युमिक आम्ले व वाढसंवर्धके growth hormones सहज नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. आच्छादनाने जमिनीत देशी गांढुळांच्या हालचालीसाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण आपोआप निर्माण होते व मग ही गांडुळे जमिनीची नैसर्गिक मशागत करतात, जमीन सच्छिद्र करून पावसाचे संपूर्ण पाणी त्या छिद्रांद्रारे जमिनीत जिरवतात व त्यांच्या विष्टेच्या माध्यमातून रोपांना अन्नद्रव्ये उपलब्ध करतात.
   बाराही महिणे भरपूर फळे लागणार्‍या व फळात भरपूर रस असलेल्या पातळ सालीच्या गावरानी निरोगी सशक्त लिंबू झाडांची बियासाठी निवड करून झाडावरच पिकलेली फळे गोळा करा. नंतर फळे भुक्कीने फोडून किंवा हळुवारपणे कापून लिंबू फळाचे दोन भाग करा. फळातून बी वेगळे करा व उन्हालगतच्या सावलीत ते बी सुकवा. ज्यावेळी बी लावायचे आहे त्यावेळी बियांना बीजामृतात दहा मिनिटे भिजवा व नंतर काढून जेथे लिंबू झाड उभे करायचे आहे त्या जागी हे बी लावायचे आहे. रोपवाटिकेतुन रोपे विकत आणूं नका, त्या रोपांचे सोटमूळ नर्सरीतच तुटलेले असल्यामुळे नर्सरीची रोपे लावल्यानंतर ती लिंबूची झाडे दुष्काळात जगत नाहीत मरतात व वादळात उन्मळून पडतात व तोपर्यंत केलेली मेहणत व आर्थिक गुंतवणूक मातीमोल होते. तेव्हा चुकुन नर्सरीची रोपे लावूं नका. आधी खड्डा ढीगातील नर्सरी मातीने पूर्ण भरून घ्या व हाताने दाबून घ्या. खड्डा भरतांना माती थोडी जमीन पातळीचे वर येऊ द्या.नंतर पावसाळा सुरु होताच बी त्या दर दोन   नारळ झांडांचे मध्यभागी दोन्ही दिशांनी नियोजित चौफुलीवर टोका डोबा व लगेच त्यावर आच्छादन झाका व झारीने एवढे पाणी शिंपडा की पाणी आच्छादनातून घुसून मातीत झिरपेल जेणेकरुन बीयाला अंकुरण्यासाठी आवश्यक ओलावा उपलब्ध होईल व अतिरिक्त पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दाबाने शेजारच्या नालीत उतरून मुळ्यांजवळ वाफसा निर्माण होईल.ज्यावेळी बी उगवून येण्याचे स्थितीत येईल त्यावेळी आच्छादन अंकूर वर यावा म्हणून हटवा. बी उगवून रोप वाढायला लागले की पुन्हा रोपाभोवती आच्छादन झाका.
   नारळाचे रोपासाठी सर्वोत्तम बी फळाची निवड आवश्यक असते. त्यासाठी 35 वर्षाचे वरील वयाचे नारळ झाड निवडावे. ही नारळाची सर्वात उत्तम पुनरोत्पादक अवस्था असते.ज्या नारळ झाडाचा आकार छत्रीसारखा गोलाकार आहे, पाने रूंद व हिरवीगार आहेत, खोडाचा बुंधा जाड रुंद मजबूत आहे, सर्वात जास्त घडांची संख्या आहे व प्रति घड नारळांची संख्या जास्तीत जास्त आहे, फळगळ नाही, झाडावर कीड नाही रोग नाही, सशक्त व निकोप आहे, अशा झाडांची निवड करून त्या निवडलेल्या सर्वोत्तम झाडांना ओळख म्हणून लाल धागा बांधा व खोडावर वार्नीसने निवड नं. 1 किंवा 2 असे नंबर द्या व तशी नोदवहीत नोंद घ्या. नारळ काढण्यासाठी घड तोडूं नका. घड तोडला तर 40 % पूर्ण पकलेले व ईतर अपरिपक्व फळे मिळतात. झाडावर फळ नैसर्गिकरित्या पकले की ते पक्व फळ आपोआप जमिनीवर गळून पडते.आपण फक्त गळून पडलेले पक्व फळे वेचायची व सुरक्षित ठिकाणी साठवायची आहेत. नंतर ह्या साठविलेल्या फळातून पुन्हा एकदा पूर्णपणे पकलेल्या व सर्वोत्तम दर्जाची फळे बियासाठी निवडायची व बीजामृतात दहा मिनिटे बुडवून नर्सरीत लावायची.
     केळीचे कंद थेट केळी झाडापासून घ्या. ऊती संवर्धित म्हणजे टिश्यू कल्चरची रोपे कधीच वापरुं नये. एकतर ही रोपे दरवर्षी विकत घ्यावी लागतात, आपला खिसा आपणच कापतो.दुसरी गोष्ट म्हणजे खोडवा घेऊं शकत नाही. तिसरे कारण म्हणजे ईश्वरीय व्यवस्थेच्या विरोधात आहे. मानवाने जर आपल्या शरीराच्या ऊती काढून त्या प्रयोगशाळेत संवर्धित करून त्यापासून बाळ निर्माण केले तर विवाह, कुटुंब व नाती ही प्रचलित व्यवस्थाच नष्ट होईल. चवथे कारण म्हणजे टिश्यु कल्चर केळीवर पर्णगुच्छ, करपा व अन्य रोग येत नाही हा दावा खोटा ठरलेला आहे. ज्या गावरानी किंवा ठेंगू कॅव्हेंडीश किंवा मध्यम उंचीची जी नाईन जातीसारखी रोबस्टा जातीच्या खोडाचा बुंधा भरपुर रुंद मजबूत भरदार आहे, पाने रुंद व हिरवीगार आहे, कीडरोग नाही निकोप आहे, घड सर्वात मोठा व जास्त वजनाचा आहे, बाजारात जास्त मागणी आहे व भाव जास्त आहे अशा  झाडांचे 400 ते 800 ग्रॅम वजनाची नारळाचे आकाराची तांबड्या चमकदार सालीचे  कंद बेण्यासाठी निवडावे.कंद बीजामृतात बुडवून लावावे.

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 4

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 4

मित्रांनो, आपल्या माॅडेल मध्ये आपण सागाचे जागी जाळफळ घेऊं शकतो.तसेच दाळींबाचे जागी दालचीनी घेऊं शकतो. कारण दाळींब घेण्यामध्ये मोठी जोखीम म्हणजे पोपट व ईतर पक्षी टोच मारून केव्हा आतील दाळींब दाणे खाऊन फळाचा केवळ सांगाडा ठेवतात हे आपल्याला माहीतही पडत नाही. तसेच दाळींबाच्या भावात होणारा चढऊतार जीवघेणा आहे. दालचीनी म्हणजे कलमीचे व जाळफळाचे झाड मसाल्याचे असल्यामुळे नैसर्गिक म्हणून जगभर प्रचंड मागणी असते व दरवर्षी भरपूर पैसा मिळतो. काळी मिरी कुठेही व कशावरही चढते व पसरते. तिला आधार व सावली पाहीजे. काळी मिरी खांबावर, लोखंडी पोलवर, भिंतीवर, कोणत्याही झाडाचे खोडावर , जमिनीवर व तिला परवानगी दिली तर तुमचे पाठीवरही चढते. जेथे खाण्याची पानवेल किंवा औषधी पानपिंप्री होते तेथे काळी मिरी हमखास होते. ह्या तिघी सख्या बहिणी आहेत.अमरावती जिल्यात अंजनगांव सुर्जी व अकोट तालुक्यांत सुभाष पाळेकर नैसर्गिक पद्धतीने घेतलेली पानपिंप्री उन्हाळ्याचे 47 अंश शतांश तापमानात सुद्धा दिमाखात उभी आहे. तसेच काळी मिरी,दालचीनी,जाळफळ  ह्या मसाला पिकांना फक्त वर्षभर सावली व वाहणार्‍या उष्ण वार्‍यापासून संरक्षण हवे असते. एप्रील मे च्या उन्हाची तीव्रता 8000 ते 12000 फूट कॅन्डल असते. ते भयंकर उन्ह त्यांना सहन होत नाही. काळी मिरी, दालचीनी, जाळफळ, द्राक्ष, हळद, अद्रक व ढोबळी सीमला मिरची ह्या मसाला पिकांच्या पानांना फक्त  3700 ते 5000 फूट कॅन्डल प्रखरता पाहीजे असते. पांगारा किंवा हादगा किंवा सील्व्हर ओक, नारळ ,केळी,लिंबू ही झाडे आपली माॅडेल जंगलातील उभी झाडे ह्या मसाले पिकांना ती आवश्यक तीव्रता उपलब्ध करून देतात व आवश्यक सावली वर्षभर देतात व उष्ण वार्‍यांना रोखून संरक्षण करतात. प्रत्येक फळझाडात किंवा मसाले झाडात किंवा पिकांत हवामानात होणारे घातक बदल व  दुष्काळ, अति वृष्टी, वाढते उष्णतामान, उष्णतेच्या व थंडीच्या लाटा ,गारपीट,व झाडवाढीला रोखणार्‍या बाबी ह्या नैसर्गिक आपत्तीत टिकवून राहणे व ह्या हानीकारक बदलांशी स्वताःला जुळवून घेणे व त्यासाठी त्यांचे पेशीत जन्नूक रचनेमध्ये आनुवांशिक बदल करणे ह्या  प्रक्रिया आपोआपच नैसर्गिक प्रेरणेने ईश्वर घडवून आणत असतो. आपण पाहतो की शून्याचे खालील अत्यंत थंड हवामानांत निवास करणारे युरोपीयन ,ज्यांना प्रखर उन्हाची अजिबात आनुवांशिक संवय नसते, ते जर नागपूर अमरावतीला भेटीसाठी मे मध्ये  दिवसाचे 47 अंश तापमानात आले तर हळुहळू त्यांना उन्हाची संवय होते व कांही दिवसांनी भर उन्हात फिरतांना त्यांना त्रास होत नाही. कारण निसर्गच त्यांचे शरीरात तसे आनुवांशिक बदल घडवून आणतो. तसेच पिकांचे किवा फळझाडांचे सुद्धा आहे. हाच निसर्गाचा नियम झाडांना सुद्धा लागूं होतो.  मी जेव्हा म्हणतो की विदर्भ मराठवाड्यात आपण नैसर्गिक पद्धतीने नक्कीच काळी मिरी, दालचीनी, जाळफळ, स्ट्रा बेरी, द्राक्ष  ही पश्चिम घाटात होणारी पिके घेऊ शकतो तेव्हा माझ्या म्हणण्यामागे निसर्गाचा हा परिस्थितीनुसार बदलण्याचा नियमाचा आधार असतो. हिमाचल प्रदेश व काश्मीर सोडून महाराष्ट्रासह अन्य राज्यात सफरचंद होऊच शकत नाही असा ठासून दावा करणारे कृषी विद्यापीठे, त्यांनी पुणे येथे येऊन जीवामृतावर सुंदर फळे लागलेली सफरचंदाची झाडे पाहून घ्यावी. महाबळेश्वर ह्या थंड हवेची स्थळे सोडली तर ईतर जिल्यात विदर्भ मराठवाडा किंवा खाणदेशात स्ट्राॅबेरी घेऊच शकत नाही असे म्हणणार्‍या शास्रज्ञांना व कृषी अधिकार्‍यांना निमंत्रण देतो की त्यांनी मार्च मध्ये दिवसाचे 42 अंश शतांश तापमान असणार्‍या व भल्या भल्यांना घाम फोडणार्‍या नागपूर नगरीत मार्चमध्ये यावे व जीवामृतावर वाढणारी सुंदर स्ट्राॅ बेरी बघावी. नाशीक पुणे सांगली सोलापूर,नगर, उस्मानाबाद व लातूर जिल्हे सोडले तर विदर्भ मराठवाडा खाणदेशात द्राक्ष घेऊच शकत नाही असा दावा करणार्‍यांना विनंती करतो की विदर्भातील बुलढाणा जिल्यातील सुंदर द्राक्षे त्यांनी बघून घ्यावीत. पाॅली हाऊस मध्ये रासायनिक शेतीशिवाय विदेशी रंगीत ढोबळी मिरची होऊच शकत नाही म्हणणार्‍यांनी 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्राने भरपूर पगाराची ईंजिनीयर पदाची नोकरी सोडून श्री.जितेंद्र थेटे मु.पो. नीमगांव जाळी ता.संगमनेर जि.नगर 8888139007,  7972437010 ह्यांनी पाॅलीहाऊसमध्ये घेतलेली व रासायनिक शेतीत मिळालेल्या उत्पन्नापेक्षा पहिल्याच वर्षी दुप्पट उत्पादन दिलेली पाॅली हाऊसमधील विदेशी रंगीत नैसर्गिक ढोबळी मिरची बघून घ्यावी. मे महिण्यातील भयंकर तापमानात रासायनिक शेतीत पालेभाज्या येतच नाही,सुकतात असा अनुभव सर्वांचाच आहे. पण सुभाष पाळेकर तंत्राने घेतलेल्या पालेभाज्या नांगपूर जिल्यातील चाचेर येथील आपले सेनापती शेतकरी श्री.विरेन बरबटे 9730220136 ह्यांच्या नैसर्गिक पालेभाज्या दिवसाच्या 47.6 अंश शतांश ह्या माणसाला भाजून काढणार्‍या उच्चतम तापमानात हिरव्यागार व सुंदर वाढीचे रुपात दिमाखाने उभ्या आहेत, तो चमत्कार आपण आजच जाऊन पाहूं शकता. रासायनिक शेतीत होणार्‍या एकरी तीन लाख रूपये उत्पादन खर्च केल्याशिवाय अन्य कोणत्याही तंत्राने द्राक्ष शेती होऊच शकत नाही असा दावा करणारे कृषी शास्रज्ञ व द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने पिकविलेले द्राक्ष पीक ह्या वर्षी शिवार फेरीत सामील झालेल्या 700 द्राक्ष उत्पादकांनी सांगली जिल्यातील मिरज तालुक्यातील मंगसोळी गांवचे श्री.जनार्दन उत्तम पाटील 7676147070,   9663779974 ह्यांची पाळेकर तंत्राने घेतलेली व अत्यंत सुदर घडांनी भरुन गेलेली रोगमुक्त ,शून्य उत्पादन खर्चाची व एकरी सात लाख रुपयांचे उत्पन्न दिलेली निर्यातक्षम द्राक्षबाग बघितली.आपण सुद्धा चमत्कार त्यांना भेटून समजून घ्या.  अशक्य ते शक्य करण्याची अदभूत क्षमता सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर ऊन्हाळ्यात भयंकर आग ओकणार्‍या विदर्भात हजारो वर्षापासून बारी समाज पानवेली व पानपिंप्री  यशस्वीपणे घेतात, त्या ऐवजी काळी मिरी ही सख्खी बहीण सुद्धा आपण आधी सावली देणारी झाडे वाढू देऊन पांच वर्षानंतर नारळाचे , सागाचे व शेवग्याचे खोडाजवळ काळी मिरी लावून नक्कीच यशस्वी करू. ह्या माॅडेलमध्ये दोन सागाचे जागी  जाळफळ रोपे व दोन दाळींबाचे ठिकाणी दालचीनी रोपे नमुना म्हणून लावूं या. पांगारा किंवा हादग्याला सील्व्हर ओक हे वेगाने सरळ उभे वाढणारे व द्राक्ष वेलींना मजबूत आधार देणारे झाड एक चांगला पर्याय होऊं शकतो. सील्व्हर ओकला प्लायवुड निर्मिती ऊद्योगात व आगपेटी ऊद्योगात  खूप मागणी व भाव आहेत. सर्व पर्याय मी आपणासमोर ठेवतो आहे.नारळाला किंवा लींबूला पर्याय  चिंच रामफल जांभूळ आवळा आंबा चीकू होऊ शकत नाही, कारण ह्यांची पुढे मोठी विस्तारलेली वृक्ष होतात व घनदाट सावली देतात, परिणामी आंतरपिके घेणे शक्य होत नाही.देशी शेवग्याला पीकेएम किंवा ओडीसी सुधारित शेवगा चांगला पर्याय ठरतो.
     रासायनिक शेती व हवामान बदलामुळे देशातील पानमळे वेगाने सुकत आहेत, परंतु सुभाष पाळेकर शेती पद्धतीने घेतलेले पानमळे जिंवंत आहेत व सुंदर उत्पादन देत आहेत. ह्या माॅडेलमध्ये आपण नारळ,लिंबू,साग,शेवगा,सीताफळ दाळींब ह्या फळझाडांचे सावलीत जमिनीवरील आच्छादनावर पानवेली व स्ट्राॅ बेरी व द्राक्ष   घेणार आहोत. विश्वास बसत नाही ना ? पण हे सगळे प्रयोग जीवामृतावर यशस्वी झालेले आहेत व पुढील शिवार फेरीत आपण ते पाहणार आहात. स्ट्राॅ बेरीची रोपे दरवर्षी युरोपमधून आयात करून  विकत आणायची गरज नाही. एकदा ही रोपे विकत आणली की पुढच्या वर्षासाठी आपली स्ट्राॅ बेरीची रोपे आपणच तयार करायची आहेत. हे आम्ही सातारा तालुक्यात व महाबळेश्वरला केले आहे.
ह्या माॅडेलमध्ये एकरी किती झाड संख्या बसते
नारळ 75,   लिंबू 150, साग 75 किंवा जाळफळ 75,,  शेवगा 150,  केळी 150, सीताफळ 300, दाळींब किंवा दालचीनी 300,  द्राक्ष छाटकलम 1200, पांगारा किंवा हादगा किंवा सील्व्हर ओक 1200, मिरची 2400, झेंडु 4800, तूर 3200.
हे बी किंवा रोपे किंवा छाटकलम कुठे उपलब्ध होतील ?
हादगा बी —.श्री.सागर नेमाडे मुंपो.सुर्जी अंजनगाव ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 9922897747 हादगा
श्री.नरेंन्द्र जायले मु.मक्रमपूर पो.उमरा ता.अकोट जि.अकोला 9850630578,  7391929308 हादगा केळी
डाॅ. प्रमोद भगत , बुरुड गल्ली, बारामती जिं पुणे 9823199963, हादगा सीताफळ
श्री.तुकाराम ईंगळे 9049453400 हादगा व शेवगा बी
सुहास फुले मु.मोरोची ता,माळशिरस जि.सोलापूर 9421029024,  8975737226 केळी,हादगा, शेवगा
शेवगा— केळी
श्री.मच्छींद्र फडतरे मु.पो,बेलवाडी ता.कराड जि.सातारा 9511742454 देशी शेवगा व देशी केळी
श्री.सुवाचार पवार मु.वरणे ता जि सातारा 9890872834  शेवगा , झुडुपी चवळी
मु पिंपरद ता.फलटण जिंसातारा 9890463466  झुडुपी चवळी
श्री.राम आवारे मु.विहा मांडवा ता.पैठण जि.औरंगाबाद 9404002532,   9270313484,
श्री.भगवान जाधव मु.कवडगाव ता.अंबड जिं जालना 8308677207 शेवगा
श्री.संभाजी उबाळे 9049222500 शेवगा
श्री.आशीष 9921241413 शेवगा
श्री.अनिवृद्ध पाटील मु पो,तारसाळी ता सटाणा जिं नाशिक 9921242995 शेवगा
श्री.सुधीर पाटील मु.पो,म्हैसाळ ता.मिरज जि.सांगली 7385697677 शेवगा
श्री.सुधाकर गायकवाड मु पाचड ता.जि.सातारा 8459579631 झुडुपी चवळी
श्री.दीपक बनवारी जालना 9325025558, शेवगा
श्री.शरद शिंदे मु.पौ.मोडनिंब ता.मोहोळ जि.सोलापूर 9028598955 देशी शेवगा, झुडूपी चवळी व दाळींब कलमा
श्री.रामदास भोरे मु पो.टेंभुर्णी ता माढा जि. सोलापूर 9156161629 सीताफळ
श्री महेंद्र बागल मु.मांडवखडक ता.फलटण जि सातारा 9765051885, 9404506686,  7350765579 हादगा , केळी कंद 50 ते 80 किलो वजनाचे नैसर्गिक केळीचे घड असलेल्या केळीचे कंद.
देशी लिंबू 
श्री.बी एस पाटील मु.पो आरण ता.माढा जिं सोलापूर 9011270855 देशी लिंबू
श्री. डाॅ,गिरीश बोरसे जळगाव 9823024636 देशी लिंबू
श्री.राजशेखर निंबर्गी मु पो बेकनहल्ली ता,ईंडी जि.बीजापूर कर्नाटक 8762482005 कोरडवाहू सुंदर नैसर्गिक लिंबू ..संपर्कासाठी कन्नड किंवा ईंग्रजीत बोला किंवा मराठीत संंपर्कासाठी सुधीर पाटील 7385697677 ह्यांना मध्यस्त करणे
ईतर पत्ते पुढील लेखांकात. धन्यवाद

पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 3

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 3

मित्रांनो, ह्या माॅडेल मध्ये अनेक फळपिकांचे सहजीवी एकात्मिक संयोजन आहे. जमिनीची आडवी उभी मशागत करून जमीन उन्हात तापवू द्या.पुर्व पिकाचे अवशेष वेचून आच्छादनासाठी सुरक्षित ठिकाणी ढीग लावा किंवा रोटाव्हेटरने कुळवून ते अवशेष बारीक करून मातीत मिसळा. शेवटच्या कुळवणीचे पाळीआधी एकरी 400 किलो घनजीवामृत समप्रमाणात विस्कटून मातीत मिसळा. मान्सूनपूर्व पाऊस आल्यावर उगवून येणार्‍या तणांचा ऊत कुळवणीने मारुन टाका. मान्सूनला सुरुवात होताच तीन फुट बाय तीन फुट अंतरावर उभे आडवे सारे म्हणजे रेघा पाडून चौफुल्या तयार करा. एका एकरात एकूण 4840 चौफुल्या मिळतात.
    24 बाय 24 फूट अंतरावर उंच वाढणारे बाणावली म्हणजे वेस्ट कोस्ट टाॅल नारळाची जात लावा. ही नारळ जात  दोनशे वर्ष सुद्धा फळे देत असून फळांना जंगली जनावरे व माकडे खात नाही. नारळ झाड उंच असल्यामुळे आंतरपिकांना पाहीजे ती ऊन सावली मिळते, व झाडाखाली सहज आंतरपिके घेता येतात. नारळ झाड वर्षभर सतत उत्पादन देते, त्यामुळे हातात सतत पैसा खेळतो. नारळापासून घरीच खोबरे व नारळाचे तेल काढता येते व मुल्यवर्धन होते तसेक नारळ फळाचे सर्व अवशेष व ठराविक अंतराने गळून पडलेले पक्व नारळाची पाने आच्छादनासाठी उपलब्ध होतात. नारळाचे घरी तयार केलेले व्हर्जीन तेल खूप महाग असते, कारण ते शुद्ध असते. बाजारातील तेलाची कोणतीही हमी देता येत नाही. नारळाच्या ओल्या खोबर्‍यापासून दूध दही व तूप बनवता येते .नारळ महाराष्ट्रात सगळीकडे चांगला वाढतो , नारळांची एकरी 75 संख्या बसते.
    ह्या दर दोन नारळ झाडांचे  मध्ये नारळापासून बारा बारा फुटावर लींबू रोप लावा. लींबू फळांना सुद्धा जंगली जनावरे व माकड खात नाही व वर्षभर भरपूर उत्पादन व पैसा मिळतो. लिंबू दुष्काळांत सुद्धा टिकून राहतो. लिंबू प्रक्रिया घरी करता येते. लिंबुची एकरी 150 झाडे बसतात.
    दर चार नारळांचे मधोमध सेंटरला साग लावा. साग म्हणजे पुढील पिढीसाठी केलेली भरपुर व्याज देणारी गुंतवणूक आहे. साग सुद्धा उंच वाढत असल्यामुळे बाकीच्या आंतरपिकांना आवश्यक ऊनसावलीचा खेळ उपलब्ध करतो, लावणीपासून वीस वर्षांनी सागाचे खोडात   नक्षीकाम करण्यासाठी आवश्यक लाकूड दर्जा निर्माण होतो. सागाची पानगळ होऊन अनायसे आच्छादनासाठी काष्ट पदार्थ मिळतो. सागाची एकरी 75 झाडे बसतात. नारळ व साग लावल्यांनंतर पांच वर्षांनी त्यांच्या खोडापासून दीड फूट अंतरावर करीमुंडा ह्या देशी जातीच्या काळीमिरीचे रोप लावायचे व वेली नारळ व सागाचे खोडावर चढवणार आहोत. जेथे विड्याची पानवेल व पानपिपरी येते तेथे काळी मिरी हमखास येते. काळी मिरीला सावली व आधार पाहीजे.पानवेल महाराष्ट्रात सगळीकडे येते.
    प्रत्येक नारळ व लींबू ह्यांचेमध्ये मधोमध शेवगा लावा. एकरी शेवगा 150 झाडे बसतात. जून मध्ये शेवगा लावल्यानंतर दोन महिण्यानंतर सप्टेंबर मध्ये शेवग्यापासून एक फुटावर काळी मिरीचे रोप लावा व नंतर ह्या वेली शेवग्यावर चढवायच्या आहेत. नारळ व सागाचे खोडावर व शेवग्यावर चढविण्यासाठी काळी मिरीची एकूण एकरी 300 रोपे हवी आहेत.शेवगा व काळी मिरीला सुद्धा पक्षी व जंगली जनावरे खात नाहीत.
  लिंबू व साग ह्यांचे मधोमध देशी केळी लावा. देशी केळीचे एकरी 150 कंद हवेत. हिरव्या केळीला जंगली जनावरे व पाखरे खात नाही.तसेच ह्यातच आपल्याल्या सीताफळ लावायचे आहे,सीताफळाला सुद्धा जंगली जनावरे व माकड खात नाहीत. फक्त सीताफळ आंतरपीक म्हणून बारा बाय बारा फूट अंतरावर घेतले तर एकरी 600 झाडे बसतात. परंतु एकाआड एक सीताफळ व दाळींब लावले तर सीताफळाची एकरी 300 झाडे व दाळींबाची 300 झाडे बसतात.
    ह्या प्रत्येक दोन फळझाडामध्ये सहा बाय सहा फूट अंतरावर पांगारा किंवा हादगा म्हणजे हेटा बी किंवा रोप लावायचे  आहे. एकरी पांगारा किंवा हादगाची 1200 झाडे बसतात. जूनमध्ये पांगारा किंवा हादगा लावल्यानंतर चार महिण्यांनी आॅक्टोंबरमध्ये पांगार्‍यापासून किंवा हादग्यापासून एक फुटावर रेड ग्लोब, एआरआय 516 व अनाबेशाही जातीच्या बियाच्या द्राक्ष वेलींचे छाटकलम लावायचे आहेत. आम्ही ती उपलब्ध करून देऊं.
रोप लावणीचे ओळीनुरुप नियोजन— ह्या माॅडेल मध्ये दर तीन फूट अंतरावर रोपलावणीच्या ओळी येतात. 24 बाय 24  फूट अंतरावर लावलेल्या एका नारळाचे क्षेत्रात दर तीन फूटावर येणार्‍या आठ ओळी येतात. व प्रत्येक ओळीत दर तीन फुटावर रोप लावायचे आहे. त्याचे नियोजन पुढील प्रमाणे..,.
ओळ क्रमांक नं.1...मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यावर पुढील आठ प्रकारची रोपे लावायचे आहेत...
१)नारळ...२)पांगारा...३)शेवगा...४)पांगारा..५)लींबू...६)पांगारा.,.७)शेवगा...८)पांगारा..पुन्हा १)नारळ व पुढे हाच क्रम बागेच्या सीमेपर्यत सुरु राहील
ओळ क्रमांक 2— पहिल्या ओळीपासून खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं.2 मध्ये प्रत्येक तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर तुर अधिक अंबाडी अधिक चवळी अधिक बाजरा बी मिश्रण टोकायचे डोबायचे आहे.
ओळ क्रमांक 3 मध्ये..ओळ नंबर दोन नंतर खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं. 3 मध्ये प्रत्येक चौफुलीवर अनुक्रमे पुढील आठ प्रकारची रोपे एकानंतर एक बागेची सीमा संपेपावेतो त्याच क्रमाने पुढीलप्रमाणे लावायची आहेत..
१)सीताफळ...२)पांगारा किंवा हादगा..३).दाळींब...४)पांगारा....५)सीताफळ...६)पांगारा....७)दाळींब....८)पांगारा....पुन्हा १) सीताफळ व पुढे हाच क्रम शेवटपर्यंत
ओळ क्रमांक 4— ओळ नं. तीन नंतर तीन फुटावर आलेल्या ओळ नं.4 मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर एका नंतर एक अशी आठ रोपे लावायची आहेत व पुढे हाच क्रम शेवटपर्यंत सुरु ठेवायचा आहे...तो पुढीलप्रमाणे...
प्रत्येक चौफूलीवर तूर अधिक अंबाडी अधिक चवळी अधिक बाजरा हे सर्व बी मिसळून बीजामृताचा संस्कार करून टोकायचे आहे.
ओळ क्रमांक 5... ओळ क्रमांक चार नंतर तीन फूटावर आलेल्या ओळ क्रमांक 4 मध्ये सुद्धा दर तीन फुटावरील प्रत्येक चौफुलीवर पुढील रोपे अनुक्रमें लावायची आहेत.तो क्रम पुढीलप्रमाणे आहे.,
१)लिंबू....२)पांगारा..,३)केळी...४)पांगारा...५)सागवान....६)पांगारा...७)केळी....,८)पांगारा.....व पुन्हा १)लिंबू व पुढील तोच क्रम बाग संपेपर्यंत.
ओळ क्रमांक 6--ओळ नं. 5 नंतर खाली तीन फुटावर आलेल्या ओळ नं. 6 मध्ये सुद्धा दर तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर तूर अधिक अंबाडी अधिक चवळी अधिक बाजरा हे बी एकत्र मिसळून व बीजामृताचा संस्कार करून हे बी मिश्रण टोकायचे आहे..बागेच्या शेवटपर्यंत.
ओळ क्रमांक 7- ओळ क्रमांक 6 नंतर खाली तीन फुटावर आलेल्या ओळ नं.7 वर दर तीन फुटावर आलेल्या प्रत्येक चौफुलीवर क्रमाने आठ प्रकारची रोपे लावायची आहेत. तो क्रमपुढीलप्रमाणे..
१)सीताफळ....२)पांगारा.....३)दाळींब...४)पांगारा...५)सीताफळ.....६)पांगारा....७)दाळींब...८)पांगारा ......व नंतर पुन्हा 1)सीताफळ असा क्रम शेवटपर्यंत सुरू ठेवायचा आहे.
शेवटची ओळ क्रमांक 8— ओळ नं. 7 नंतर खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ क्रमांक 8 मध्ये प्रत्येकी तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर तूर अंबाडी चवळी बाजरा बी मिश्रण टोका.
पुढील मजकूर लेखांक नं.4 मध्ये येणार आहे.