पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 4

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 4

मित्रांनो, आपल्या माॅडेल मध्ये आपण सागाचे जागी जाळफळ घेऊं शकतो.तसेच दाळींबाचे जागी दालचीनी घेऊं शकतो. कारण दाळींब घेण्यामध्ये मोठी जोखीम म्हणजे पोपट व ईतर पक्षी टोच मारून केव्हा आतील दाळींब दाणे खाऊन फळाचा केवळ सांगाडा ठेवतात हे आपल्याला माहीतही पडत नाही. तसेच दाळींबाच्या भावात होणारा चढऊतार जीवघेणा आहे. दालचीनी म्हणजे कलमीचे व जाळफळाचे झाड मसाल्याचे असल्यामुळे नैसर्गिक म्हणून जगभर प्रचंड मागणी असते व दरवर्षी भरपूर पैसा मिळतो. काळी मिरी कुठेही व कशावरही चढते व पसरते. तिला आधार व सावली पाहीजे. काळी मिरी खांबावर, लोखंडी पोलवर, भिंतीवर, कोणत्याही झाडाचे खोडावर , जमिनीवर व तिला परवानगी दिली तर तुमचे पाठीवरही चढते. जेथे खाण्याची पानवेल किंवा औषधी पानपिंप्री होते तेथे काळी मिरी हमखास होते. ह्या तिघी सख्या बहिणी आहेत.अमरावती जिल्यात अंजनगांव सुर्जी व अकोट तालुक्यांत सुभाष पाळेकर नैसर्गिक पद्धतीने घेतलेली पानपिंप्री उन्हाळ्याचे 47 अंश शतांश तापमानात सुद्धा दिमाखात उभी आहे. तसेच काळी मिरी,दालचीनी,जाळफळ  ह्या मसाला पिकांना फक्त वर्षभर सावली व वाहणार्‍या उष्ण वार्‍यापासून संरक्षण हवे असते. एप्रील मे च्या उन्हाची तीव्रता 8000 ते 12000 फूट कॅन्डल असते. ते भयंकर उन्ह त्यांना सहन होत नाही. काळी मिरी, दालचीनी, जाळफळ, द्राक्ष, हळद, अद्रक व ढोबळी सीमला मिरची ह्या मसाला पिकांच्या पानांना फक्त  3700 ते 5000 फूट कॅन्डल प्रखरता पाहीजे असते. पांगारा किंवा हादगा किंवा सील्व्हर ओक, नारळ ,केळी,लिंबू ही झाडे आपली माॅडेल जंगलातील उभी झाडे ह्या मसाले पिकांना ती आवश्यक तीव्रता उपलब्ध करून देतात व आवश्यक सावली वर्षभर देतात व उष्ण वार्‍यांना रोखून संरक्षण करतात. प्रत्येक फळझाडात किंवा मसाले झाडात किंवा पिकांत हवामानात होणारे घातक बदल व  दुष्काळ, अति वृष्टी, वाढते उष्णतामान, उष्णतेच्या व थंडीच्या लाटा ,गारपीट,व झाडवाढीला रोखणार्‍या बाबी ह्या नैसर्गिक आपत्तीत टिकवून राहणे व ह्या हानीकारक बदलांशी स्वताःला जुळवून घेणे व त्यासाठी त्यांचे पेशीत जन्नूक रचनेमध्ये आनुवांशिक बदल करणे ह्या  प्रक्रिया आपोआपच नैसर्गिक प्रेरणेने ईश्वर घडवून आणत असतो. आपण पाहतो की शून्याचे खालील अत्यंत थंड हवामानांत निवास करणारे युरोपीयन ,ज्यांना प्रखर उन्हाची अजिबात आनुवांशिक संवय नसते, ते जर नागपूर अमरावतीला भेटीसाठी मे मध्ये  दिवसाचे 47 अंश तापमानात आले तर हळुहळू त्यांना उन्हाची संवय होते व कांही दिवसांनी भर उन्हात फिरतांना त्यांना त्रास होत नाही. कारण निसर्गच त्यांचे शरीरात तसे आनुवांशिक बदल घडवून आणतो. तसेच पिकांचे किवा फळझाडांचे सुद्धा आहे. हाच निसर्गाचा नियम झाडांना सुद्धा लागूं होतो.  मी जेव्हा म्हणतो की विदर्भ मराठवाड्यात आपण नैसर्गिक पद्धतीने नक्कीच काळी मिरी, दालचीनी, जाळफळ, स्ट्रा बेरी, द्राक्ष  ही पश्चिम घाटात होणारी पिके घेऊ शकतो तेव्हा माझ्या म्हणण्यामागे निसर्गाचा हा परिस्थितीनुसार बदलण्याचा नियमाचा आधार असतो. हिमाचल प्रदेश व काश्मीर सोडून महाराष्ट्रासह अन्य राज्यात सफरचंद होऊच शकत नाही असा ठासून दावा करणारे कृषी विद्यापीठे, त्यांनी पुणे येथे येऊन जीवामृतावर सुंदर फळे लागलेली सफरचंदाची झाडे पाहून घ्यावी. महाबळेश्वर ह्या थंड हवेची स्थळे सोडली तर ईतर जिल्यात विदर्भ मराठवाडा किंवा खाणदेशात स्ट्राॅबेरी घेऊच शकत नाही असे म्हणणार्‍या शास्रज्ञांना व कृषी अधिकार्‍यांना निमंत्रण देतो की त्यांनी मार्च मध्ये दिवसाचे 42 अंश शतांश तापमान असणार्‍या व भल्या भल्यांना घाम फोडणार्‍या नागपूर नगरीत मार्चमध्ये यावे व जीवामृतावर वाढणारी सुंदर स्ट्राॅ बेरी बघावी. नाशीक पुणे सांगली सोलापूर,नगर, उस्मानाबाद व लातूर जिल्हे सोडले तर विदर्भ मराठवाडा खाणदेशात द्राक्ष घेऊच शकत नाही असा दावा करणार्‍यांना विनंती करतो की विदर्भातील बुलढाणा जिल्यातील सुंदर द्राक्षे त्यांनी बघून घ्यावीत. पाॅली हाऊस मध्ये रासायनिक शेतीशिवाय विदेशी रंगीत ढोबळी मिरची होऊच शकत नाही म्हणणार्‍यांनी 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्राने भरपूर पगाराची ईंजिनीयर पदाची नोकरी सोडून श्री.जितेंद्र थेटे मु.पो. नीमगांव जाळी ता.संगमनेर जि.नगर 8888139007,  7972437010 ह्यांनी पाॅलीहाऊसमध्ये घेतलेली व रासायनिक शेतीत मिळालेल्या उत्पन्नापेक्षा पहिल्याच वर्षी दुप्पट उत्पादन दिलेली पाॅली हाऊसमधील विदेशी रंगीत नैसर्गिक ढोबळी मिरची बघून घ्यावी. मे महिण्यातील भयंकर तापमानात रासायनिक शेतीत पालेभाज्या येतच नाही,सुकतात असा अनुभव सर्वांचाच आहे. पण सुभाष पाळेकर तंत्राने घेतलेल्या पालेभाज्या नांगपूर जिल्यातील चाचेर येथील आपले सेनापती शेतकरी श्री.विरेन बरबटे 9730220136 ह्यांच्या नैसर्गिक पालेभाज्या दिवसाच्या 47.6 अंश शतांश ह्या माणसाला भाजून काढणार्‍या उच्चतम तापमानात हिरव्यागार व सुंदर वाढीचे रुपात दिमाखाने उभ्या आहेत, तो चमत्कार आपण आजच जाऊन पाहूं शकता. रासायनिक शेतीत होणार्‍या एकरी तीन लाख रूपये उत्पादन खर्च केल्याशिवाय अन्य कोणत्याही तंत्राने द्राक्ष शेती होऊच शकत नाही असा दावा करणारे कृषी शास्रज्ञ व द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने पिकविलेले द्राक्ष पीक ह्या वर्षी शिवार फेरीत सामील झालेल्या 700 द्राक्ष उत्पादकांनी सांगली जिल्यातील मिरज तालुक्यातील मंगसोळी गांवचे श्री.जनार्दन उत्तम पाटील 7676147070,   9663779974 ह्यांची पाळेकर तंत्राने घेतलेली व अत्यंत सुदर घडांनी भरुन गेलेली रोगमुक्त ,शून्य उत्पादन खर्चाची व एकरी सात लाख रुपयांचे उत्पन्न दिलेली निर्यातक्षम द्राक्षबाग बघितली.आपण सुद्धा चमत्कार त्यांना भेटून समजून घ्या.  अशक्य ते शक्य करण्याची अदभूत क्षमता सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर ऊन्हाळ्यात भयंकर आग ओकणार्‍या विदर्भात हजारो वर्षापासून बारी समाज पानवेली व पानपिंप्री  यशस्वीपणे घेतात, त्या ऐवजी काळी मिरी ही सख्खी बहीण सुद्धा आपण आधी सावली देणारी झाडे वाढू देऊन पांच वर्षानंतर नारळाचे , सागाचे व शेवग्याचे खोडाजवळ काळी मिरी लावून नक्कीच यशस्वी करू. ह्या माॅडेलमध्ये दोन सागाचे जागी  जाळफळ रोपे व दोन दाळींबाचे ठिकाणी दालचीनी रोपे नमुना म्हणून लावूं या. पांगारा किंवा हादग्याला सील्व्हर ओक हे वेगाने सरळ उभे वाढणारे व द्राक्ष वेलींना मजबूत आधार देणारे झाड एक चांगला पर्याय होऊं शकतो. सील्व्हर ओकला प्लायवुड निर्मिती ऊद्योगात व आगपेटी ऊद्योगात  खूप मागणी व भाव आहेत. सर्व पर्याय मी आपणासमोर ठेवतो आहे.नारळाला किंवा लींबूला पर्याय  चिंच रामफल जांभूळ आवळा आंबा चीकू होऊ शकत नाही, कारण ह्यांची पुढे मोठी विस्तारलेली वृक्ष होतात व घनदाट सावली देतात, परिणामी आंतरपिके घेणे शक्य होत नाही.देशी शेवग्याला पीकेएम किंवा ओडीसी सुधारित शेवगा चांगला पर्याय ठरतो.
     रासायनिक शेती व हवामान बदलामुळे देशातील पानमळे वेगाने सुकत आहेत, परंतु सुभाष पाळेकर शेती पद्धतीने घेतलेले पानमळे जिंवंत आहेत व सुंदर उत्पादन देत आहेत. ह्या माॅडेलमध्ये आपण नारळ,लिंबू,साग,शेवगा,सीताफळ दाळींब ह्या फळझाडांचे सावलीत जमिनीवरील आच्छादनावर पानवेली व स्ट्राॅ बेरी व द्राक्ष   घेणार आहोत. विश्वास बसत नाही ना ? पण हे सगळे प्रयोग जीवामृतावर यशस्वी झालेले आहेत व पुढील शिवार फेरीत आपण ते पाहणार आहात. स्ट्राॅ बेरीची रोपे दरवर्षी युरोपमधून आयात करून  विकत आणायची गरज नाही. एकदा ही रोपे विकत आणली की पुढच्या वर्षासाठी आपली स्ट्राॅ बेरीची रोपे आपणच तयार करायची आहेत. हे आम्ही सातारा तालुक्यात व महाबळेश्वरला केले आहे.
ह्या माॅडेलमध्ये एकरी किती झाड संख्या बसते
नारळ 75,   लिंबू 150, साग 75 किंवा जाळफळ 75,,  शेवगा 150,  केळी 150, सीताफळ 300, दाळींब किंवा दालचीनी 300,  द्राक्ष छाटकलम 1200, पांगारा किंवा हादगा किंवा सील्व्हर ओक 1200, मिरची 2400, झेंडु 4800, तूर 3200.
हे बी किंवा रोपे किंवा छाटकलम कुठे उपलब्ध होतील ?
हादगा बी —.श्री.सागर नेमाडे मुंपो.सुर्जी अंजनगाव ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 9922897747 हादगा
श्री.नरेंन्द्र जायले मु.मक्रमपूर पो.उमरा ता.अकोट जि.अकोला 9850630578,  7391929308 हादगा केळी
डाॅ. प्रमोद भगत , बुरुड गल्ली, बारामती जिं पुणे 9823199963, हादगा सीताफळ
श्री.तुकाराम ईंगळे 9049453400 हादगा व शेवगा बी
सुहास फुले मु.मोरोची ता,माळशिरस जि.सोलापूर 9421029024,  8975737226 केळी,हादगा, शेवगा
शेवगा— केळी
श्री.मच्छींद्र फडतरे मु.पो,बेलवाडी ता.कराड जि.सातारा 9511742454 देशी शेवगा व देशी केळी
श्री.सुवाचार पवार मु.वरणे ता जि सातारा 9890872834  शेवगा , झुडुपी चवळी
मु पिंपरद ता.फलटण जिंसातारा 9890463466  झुडुपी चवळी
श्री.राम आवारे मु.विहा मांडवा ता.पैठण जि.औरंगाबाद 9404002532,   9270313484,
श्री.भगवान जाधव मु.कवडगाव ता.अंबड जिं जालना 8308677207 शेवगा
श्री.संभाजी उबाळे 9049222500 शेवगा
श्री.आशीष 9921241413 शेवगा
श्री.अनिवृद्ध पाटील मु पो,तारसाळी ता सटाणा जिं नाशिक 9921242995 शेवगा
श्री.सुधीर पाटील मु.पो,म्हैसाळ ता.मिरज जि.सांगली 7385697677 शेवगा
श्री.सुधाकर गायकवाड मु पाचड ता.जि.सातारा 8459579631 झुडुपी चवळी
श्री.दीपक बनवारी जालना 9325025558, शेवगा
श्री.शरद शिंदे मु.पौ.मोडनिंब ता.मोहोळ जि.सोलापूर 9028598955 देशी शेवगा, झुडूपी चवळी व दाळींब कलमा
श्री.रामदास भोरे मु पो.टेंभुर्णी ता माढा जि. सोलापूर 9156161629 सीताफळ
श्री महेंद्र बागल मु.मांडवखडक ता.फलटण जि सातारा 9765051885, 9404506686,  7350765579 हादगा , केळी कंद 50 ते 80 किलो वजनाचे नैसर्गिक केळीचे घड असलेल्या केळीचे कंद.
देशी लिंबू 
श्री.बी एस पाटील मु.पो आरण ता.माढा जिं सोलापूर 9011270855 देशी लिंबू
श्री. डाॅ,गिरीश बोरसे जळगाव 9823024636 देशी लिंबू
श्री.राजशेखर निंबर्गी मु पो बेकनहल्ली ता,ईंडी जि.बीजापूर कर्नाटक 8762482005 कोरडवाहू सुंदर नैसर्गिक लिंबू ..संपर्कासाठी कन्नड किंवा ईंग्रजीत बोला किंवा मराठीत संंपर्कासाठी सुधीर पाटील 7385697677 ह्यांना मध्यस्त करणे
ईतर पत्ते पुढील लेखांकात. धन्यवाद