कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 9
मित्रांनो, आता आपल्या जोखीममुक्त माॅडेलचे अंतिम प्रारुप तयार झालेले आहे. मशागत करून व शेवटच्या मशागतीआधी एकरी 400 किलो घनजीवामृत जमिनीत मिसळून दर तीन फूट अंतरावर आपण आडव्या उभ्या चौफुल्या पाडायच्या आहेत. नंतर प्रत्येक ओळीत पुढीलप्रमाणे रोपांची लावणी किंवा बियांची डोबणी म्हणजेच टोकणी मागील सर्व लेखांकांत सांगितल्याप्रमाणे करायची आहे. हा प्रत्येक ओळीतील फळझाडांचा क्रम पुढील प्रमाणे येईल.....
माॅडेलच्या सीमेवरील ओळ नंबर 1— माॅडेलचे चारही बाजुंनी सीमेवर दर साडेचार फुटावर सुरुची रोपे किंवा नाही मिळाली तर हादग्याचे बी लावा व दर दोन हादग्याचे मधोमध करवंदाचे बी किंवा रोप लावा.करवंदाचे बी साठी संपर्क करा..संदीप 7020482215 व बियांसाठी संपर्क श्री.वाजीब शेख जालना 9881430972
ओळ नं.2.---ओळ नं. एकचे खाली तीन फुटावर येणार्या ओळ नं. दोन मध्ये दर तीन फुटावर येणार्या चौफुल्यावर एकाआड एक तूर अधिक चवळी अधिक अंबाडी अधिक तीळ अधिक बाजरी हे बीज मिश्रण व नंतर कापूस म्हणजे एक कापूस एक तूरमिश्रण नंतर पुन्हा कापूस ...तूर असा क्रम चालू द्या सीमेपर्यंत. देशी कापूस नाही मिळाला तर बी.टी.कापूस लावा. आपले तंत्र देशी व बी.टी.ला समान परिणाम देते. जर कापूस घ्यायचा नसेल तर फक्त तूरबीमिश्रण घ्या.
ओळ नं.3---ओळ नं.2 चे खाली तीन फुटावर येणार्या ओळ नं.तीन मध्ये माॅडेलचे चारही बाजुंनी दर सहा फूटावर ऊस लावा व दोन ऊस बेण्यांचे मधोमध हळद अद्रक मिरची लावा.
ओळ नं.4---ओळ नं.तीनचे खाली तीन फुटावर येणार्या ओळ नं.चार मध्ये पुन्हा दर तीन फुटावर येणार्या चौफुल्यावर वर सांगितल्याप्रमाणे तूरबीज मिश्रण.. कापूस क्रम किंवा फक्त तूरबीजमिश्रण सीमेपर्यंत.
ओळ नं.5---ओळ नं.चारचे तीन फूट खाली येणार्या ओळ नं. पांच मध्ये...दर तीन फुटावर येणार्या चौफुल्यावर एका रेषेत माॅडेलच्या सीमेपर्यंत पुढील क्रम चालू द्या.
1)नारळ, 2)हादगा, 3)शेवगा सुधारित पीकेएम किंवा ओडीसी किंवा वसंत जात, 4)हादगा, 5)लिंबू बी, 6)हादगा, 7) शेवगा, 8)हादगा,...ह्यापुढे पुन्हा तोच क्रम सीमेपर्यंत..नारळ..हादगा...शेवगा...हादगा..लिंबू...हादगा...शेवगा...हादगा..व पुन्हा नारळ व लावणीचा पुढील क्रम माॅडेलचे सीमेपर्यंत सुरु ठेवा.
ओळ नं.6--- ह्या ओळ नं.पांचचे तीन फूट खाली येणार्या ओळी नं. सहा मध्ये दर तीन फुटावर येणार्या चौफुल्यांवर तूरबीमिश्रण ...कापूस किंवा केवळ तूर मिश्रण माॅडेलचे सीमेपर्यंत टोकावे.
ओळ नं.7--- ओळ नं. सहाचे तीन फूट खाली येणार्या ओळ नं. सात मध्ये दर तीन फुटावर येणार्या एका आड एक चौफुलीवर केळीचे कंद व नंतर हादगा नंतर पुन्हा केळी नंतर हादगा असा माॅडेलचे सीमेपर्यंत केळी..हादगा असा एकाआड एक क्रम सुरु ठेवावा.
ओळ नं.8----ओळ नं.सातचे तीन फूट खाली येणार्या ओळ नं.आठ मध्ये दर तीन फुटावर येणार्या चौफुल्यावर तूरबीजमिश्रण ...कापूस..असा क्रम किंवा फक्त तूरबीजमिश्रण टोकावे.
ओळ नं.9---ओळ नं.आठचे तीन फूट खाली येणार्या ओळ नं.नऊमध्ये दर तीन फुटावर येणार्या चौफुल्यांवर पुढील क्रम सुरु ठेवा..1)लिंबू, 2)हादगा, 3)सुधारित शेवगा, 4)हादगा, 5)गावरानी बहुवार्षिक शेवगा, 6)हादगा, 7)सुधारित शेवगा, 8)हादगा व नंतर पुन्हा तोच क्रम माॅडेलच्या सीमेपर्यंत...लिंबू...हादगा..सुधारित शेवगा...हादगा....गावरानी बहुवार्षिक शेवगा...हादगा...सुधारित शेवगा...हादगा व पुढे लिंबु व पुढील क्रम माॅडेलचे सीमेपर्यंत सुरु ठेवा.
ओळ नं.10---ओळ नं.नऊचे तीन फुट खाली येणार्या ओळ नं.दहा मध्ये दर फुटावर येणार्या चौफुल्यावर एकाआड एक तूरबीज मिश्रण नंतर कापुस असा क्रम किंवा फक्त तूरबीज मिश्रण टोका.
ओळ नं.11---ओळ नं.दहाचे तीन फूट खाली येणार्या ओळ नं.अकरामध्ये दर तीन फुटावर येणार्या प्रत्येक चौफुल्यावर केळीचे कंद नंतर हादगा नंतर केळी नंतर हादगा असा अनुक्रमे केळी ...हादगा ...केळी...हादगा...असा एका आड एक क्रम माॅडेलचे सीमेपर्यंत असा लावणीचा क्रम सुरु ठेवा.
ओळ नं.12--- ओळ नं.अकराचे तीन फूट खाली येणार्या ओळ नं.बारा मध्ये दर तीन फूटावर येणार्या चौफुल्यावर एका आड एक तूरबीजमिश्रण नंतर कापूस नंतर तूरबीज मिश्रण पुन्हा कापूस असा क्रम किंवा फक्त तूरबीजमिश्रण टोका डोबा.
ह्या ओळ नं.12 नंतर पुन्हा एकदा एका खाली एक ओळ पुढील क्रम येईल..
ओळ नं.13 मध्ये नारळ व नंतर हादगा व ईतर फळझाडांची रोपे
ओळ नं.14 मध्ये तूर कापूस किंवा तूर
ओळ नं, 15 मध्ये केळी हादगा क्रम
ओळ नं. 16 मध्ये तूर कापूस किंवा तूर
ओळ नं. 17 मध्ये लिंबु...शेवगा असा क्रम
ओळ नं. 18 मध्ये तूर कापूस किंवा तूर
ओळ नं. 19 मध्ये केळी हादगा क्रम
ओळ नं.20 मध्ये तूर कापूस किंवा तूर
नंतर पुन्हा एका खाली एक तोच क्रम